लोकसभेत राहुल गांधी अध्यात्मात शिरले, पण नंतर क्राईम पेट्रोल स्टाईलने भारतमातेच्या हत्येचा आरोप करून बसले!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अखेर लोकसभेत राहुल गांधी आले आणि अध्यात्मात शिरून भारतमातेच्या हत्येचा बेलगाम आरोप करून बसले. भारतमातेच्या हत्येचा आरोप करणारे ते भारतातले पहिले काँग्रेस खासदार ठरले!! मोदी सरकारने मणिपूर मध्ये भारतमातेची हत्या केल्याचा बेछूट आरोप राहुल गांधींनी केला.Rahul Gandhi Unprovoked accusations of Bharat Mata’s assassination in loksabha

आत्तापर्यंत देशात प्रचंड वादविवाद झाले. गदारोळ झाले. दंगे धोपे झाले. संसदेत आणि विधिमंडळांमध्ये त्याचे जोरदार पडसाद उमटले. सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये धुमश्चकऱ्या झाल्या. पण आजपर्यंत कोणीही भारतमातेची हत्या झाल्याचा आरोप केला नव्हता. तो आरोप राहुल गांधींनी केला आणि आज 9 ऑगस्ट 2023 रोजी ऑगस्ट क्रांती दिनाच्या स्मृतीदिनी काँग्रेसच्या इतिहासात एक काळा दिवस जोडला गेला!!



काँग्रेसनेच ब्रिटिशांविरुद्ध लढताना चले जावचा नारा दिला होता. राहुल गांधींच्या रूपाने काँग्रेस पक्षाच्या खासदाराने त्या लढ्याच्या स्मृती जागविण्याऐवजी भारतमातेच्या हत्येचा बेछूट आरोप केला. त्यावेळी काँग्रेस खासदारांनी लोकसभेत जोरजोरात बाके वाजवली. आपण आपल्या नेत्याचे कोणत्या वक्तव्यासाठी समर्थन करत आहोत?, याचे भानही काँग्रेस खासदारांना राहिले नाही.

https://youtu.be/1mmyeor64I0

मोदी सरकार विरुद्धच्या अविश्वास ठरावावर राहुल गांधी आज लोकसभेत बोलले त्यांनी आपल्या भारत जोडो यात्रेची कहाणी सांगितली. त्यात अध्यात्म मिसळले. भारत जोडो यात्रेत 131 दिवस चालताना आपल्याला आध्यात्मिक साक्षात्कार झाल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले दुःख आपल्या डोळ्यात आले. शेतकऱ्यांच्या हृदयातले दुःख आपल्या हृदयात आले. मणिपूर मधल्या भगिनींचे दुःख आपल्या हृदयात साठवले, अशी अध्यात्मिक गोष्ट सांगताना राहुल गांधी भारतमातेच्या हत्येचा आरोप करून बसले. त्यामुळे संसदेत प्रचंड गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले. राहुल गांधींची अध्यात्मिक स्टोरी एका क्राइम पेट्रोलच्या स्टोरी मध्ये कन्व्हर्ट झाली!!

इतकेच नाही, तर त्यात त्यांनी अमित शाह – अदानी जोडले आणि रामाला रावणाच्या वधापासून मुक्त केले. लंका हनुमानाने जाळली नाही, रावणाच्या अहंकाराने जाळली. रामाने रावणाला मारले नाही. रावणाच्या अहंकारानेच रावणाला मारले. कारण रावण फक्त मेघराज आणि कुंभकर्ण यांचे ऐकायचा. आजचा रावण फक्त अमित शाह आणि आदानींचे ऐकतो. त्यामुळे त्याची लंका जळेल असे उद्गार राहुल गांधींनी काढले राहुल गांधींच्या या बेलगाम भाषणाला स्मृती इराणी यांनी प्रत्युत्तर दिले.

Rahul Gandhi Unprovoked accusations of Bharat Mata’s assassination in loksabha

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात