प्रियांका गांधींचे बिघडले बोल; सगळ्या नेत्यांना अदानी – अंबानींनी खरीदले, पण राहुलला खरीदू नाही शकले!!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने एकीकडे खासदार राहुल गांधी हे आपले नेतृत्व सर्व विरोधी पक्षांमध्ये प्रस्थापित करून पाहत असताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे बोल मात्र बिघडले आहेत. Priyanka Gandhi’s Bad Lyrics; All the leaders were bought by Adani-Ambanis

राहुल गांधी हे नेहमीच उद्योगपती अदानी – अंबानी यांच्याविरुद्ध टीका करत असतात. पण प्रियांका गांधींनी त्या पुढे जाऊन अदानी – अंबानींनी देशातल्या सगळ्या नेत्यांना खरेदी केल्याचा आरोप केला आहे, इतकेच नाही तर अदानी अंबानी यांनी सगळ्या देशातल्या नेत्यांना खरेदी केले. पण राहुल गांधींना ते खरेदी करू शकले नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य प्रियांका गांधी यांनी केले आहे.

राहुल गांधी यांची प्रतिमा खराब करण्यासाठी उद्योगपती आणि सरकारने हजारो करोड रुपये खर्च केले. पण त्यांची प्रतिमा ते बिघडवू शकले नाहीत. अदानी – अंबानी यांनी सगळ्या नेत्यांना खरेदी केले पण राहुल गांधींना खरेदी करू शकले नाहीत, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांची पंतप्रधान पदाच्या उमेदवारीचे प्रयत्न काँग्रेस नेते सध्या करत आहेत. काँग्रेस स्वबळावर लोकसभा निवडणूक 2024 मध्ये बहुमत मिळवण्याची शक्यता नाही. त्यामुळे राहुल गांधी भारत जोडो यात्रेसाठी सर्व विरोधी नेत्यांना निमंत्रणे पाठवत आहेत. आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, एम. के. स्टालिन आदी नेते त्यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी देखील झाले आहेत. राहुल गांधी 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार असले पाहिजेत असा कमलनाथ, भूपेश बघेल यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी बाकीच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांविषयी जपून विधाने करणे अपेक्षित असताना प्रियांका गांधी यांनी मात्र सगळ्या नेत्यांचे सरसकटीकरण करून सगळ्या नेत्यांना अदानी आणि अंबानी यांनी खरेदी केले आहे, पण राहुल गांधींना हे उद्योगपती खरेदी करू शकले नाहीत असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचे बाकीचे नेते दुखावले जाण्याची दाट शक्यता आहे. यातून काँग्रेस आणि बाकीच्या विरोधी पक्षांमधली दरी वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रियांका गांधी आपले वक्तव्य मागे घेतात की त्या अधिक आक्रमक होऊन आणखी काही दुसरीच वक्तव्ये करतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

त्याचबरोबर भारत जोडो यात्रेत फारूक अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, अखिलेश यादव, तेजस्वी यादव अशा ज्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे, ते नेते सहभागी होतात की भारत जोडो यात्रेपासून फटकून राहतात??, हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Priyanka Gandhi’s Bad Lyrics; All the leaders were bought by Adani-Ambanis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात