• Download App
    पंतप्रधान पंडित नेहरूंनी शाक्सगाम खोरे चीनला देऊन टाकले; राजनाथ सिंहांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर!! |Prime Minister Pandit Nehru ceded the Shakespeare Valley to China; Rajnath Singh's reply to Rahul Gandhi

    पंतप्रधान पंडित नेहरूंनी शाक्सगाम खोरे चीनला देऊन टाकले; राजनाथ सिंहांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर!!

    वृत्तसंस्था

    मुरादाबाद : केंद्रातल्या मोदी सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे भारताविरोधात चीन आणि पाकिस्तान एकत्र आले आहेत, असे वक्तव्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात वरील धन्यवाद प्रस्तावावर केले होते. त्याला आज संरक्षण मंत्री मंत्री राजनाथ सिंह यांनी मुरादाबाद मध्ये प्रत्युत्तर दिले आहे.Prime Minister Pandit Nehru ceded the Shakespeare Valley to China; Rajnath Singh’s reply to Rahul Gandhi

    हिमालयाच्या पर्वत रांगांमधील शाक्सगाम खोरे हे पंडित नेहरूंनी आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात चीनला देऊन टाकले हे राहुल गांधी विसरले आहेत, असे राजनाथ सिंह म्हणाले. राजनाथ सिंह यांनी त्या पुढे जाऊन दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर देखील ताशेरे ओढले. चीन जेव्हा काराकोरम मध्ये महामार्ग बनवत होता तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्यांनी मला त्यावेळी अजिबात विरोध केला नव्हता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.



    काँग्रेसच्या नेत्यांना जनतेची दिशाभूल करण्याची फार जुनी सवय आहे. खोटी आणि चुकीची माहिती दडपून सांगणे हे त्यांच्या रक्तात भिनले आहे, अशा शेलक्या शब्दांत मध्ये राजनाथसिंह यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे वाभाडे काढले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला असून राहुल गांधींचे वक्तव्य ऐतिहासिकदृष्ट्या चूक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

    Prime Minister Pandit Nehru ceded the Shakespeare Valley to China; Rajnath Singh’s reply to Rahul Gandhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही