देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ एप्रिल रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.Prime Minister Narendra Modi will interact with the Chief Minister on April 8
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ एप्रिल रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
सरकार आणि प्रशासनाने अथक प्रयत्न करूनही कोरोना आटोक्यात आणण्यात यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
राज्यात दररोज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. देशात कोरोना विषाणू संसगार्ची दुसरी लाट आल्यानंतर प्रथमचं एका दिवसात १ लाख रुग्ण समोर आल्यानं केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ एप्रिलला सायंकाळी ६.३० वाजता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आणि अधिकाºयांशी कोरोना संदर्भात चर्चा करणार आहेत. नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत.
तर केंद्रीय आरोग्यमंत्री ६ एप्रिलला सांयकाळी ६.३० मिनिटांनी ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाºयांशी चर्चा करणार आहेत.शुक्रवारी झालेल्या बैठकीत देशातील कोरोना रुग्णसंख्या जास्त असलेल्या राज्यांशी चर्चा केली.
यामध्ये ११ राज्यांची गंभीर स्थिती असणारी राज्य म्हणून वर्गवारी करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, चंदीगढ, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, दिल्ली आणि हरियाणाचा समावेश करण्यात आला आहे. या राज्यांमध्ये गेल्या १४ दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक वेगानं कोरोन रुग्णसंख्या वाढत आहे.