हनुमानासारखे कठोर होऊन घराणेशाहीशी संघर्ष; मोदींच्या भाषणातले संकेत समजायला “बिटवीन द लाईन्स” वाचावे लागेल??

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आज हनुमान जयंतीच्या दिवशी योगायोग साधून आलेल्या भाजपच्या वर्धापन दिन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे भाषण केले, त्यामध्ये सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हनुमानासारखी कठोर होऊन घराणेशाही संघर्ष करण्याचा संदेश त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला. या संदेशातला स्पष्ट संकेत वाचण्यासाठी “बिटवीन द लाईन्स” वाचण्याची गरज आहे का?? हा प्रश्न आहे, आणि त्याचे उत्तर “नाही” असे आहे!! Prime minister Narendra modi targets Dynasty politics in his BJP anniversary speech

मोदींनी आपल्या भाषणात केंद्रातल्या भाजप सरकारने राबविलेल्या सर्व कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला. हे स्वाभाविकच होते. कारण सर्वसामान्य जनतेसाठी तेच भाजपच्या सरकारचे वैशिष्ट्य आहे. पण त्या पलिकडे जाऊन 2024 च्या निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारचा जो महत्त्वाचा अजेंडा आहे, त्यावर मोदींनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले, तो म्हणजे विरोधकांनी कितीही आरडाओरडा केला, आदळपट केली तरी त्यांच्याविरुद्धच्या ईडी, सीबीआय, एनआयए यांच्या केसेस मागे हटणार नाहीत आणि त्यांच्यावरची कारवाई ढिली पडणार नाही, हेच ते स्पष्ट संकेत होते!! म्हणूनच मोदींनी देशातल्या घराणेशाही विरुद्ध हनुमानासारखे कठोर होऊन संघर्ष करण्याचा संदेश भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींची खासदारकी, त्यांनी केलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान हे विषय देशाच्या राजकारणाच्या मध्यवर्ती बिंदूवर आहेत. पण त्यापलिकडे देखील ईडी, सीबीआय कारवाईचे मुद्दे देखील सेंटर स्टेजवर आहेत. किंबहुना तेच सर्वांत महत्त्वाचे आहेत.

https://youtu.be/-RjX1I90XuI

ईडीसीबीआय कारवाई विरोधात काँग्रेस सह 14 पक्षांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर तर ईडी, सीबीआयच्या कारवाईचा वरवंटा अधिकच वेगाने फिरणे अपरिहार्य आहे. मोदींच्या सीबीआय हीरक महोत्सवात केलेल्या भाषणात आणि आजच्या भाजप वर्धापन दिलेल्या भाषणातला कॉमन फॅक्टर काढायचा झाला, तर हाच आहे की घराणेशाही आणि भ्रष्टाचार मोडून काढायचा असेल तर कठोरपणेच मोडून काढावा लागेल आणि त्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती अपेक्षित आहे ती आपल्याकडे आहे, हेच त्यांनी सांगितले आहे!!

विरोधी पक्ष संसदेपासून रस्त्यापर्यंत आणि भारत आतल्या शहर गावांपासून लंडन पर्यंत भारतात लोकशाही नसल्याचा ढिंडोरा पिटत आहेत, पण तरी देखील मोदींनी आपले लक्ष्य त्यांच्या जुन्या भ्रष्टाचारावरून हटविलेले नाही उलट हनुमानासारखे कठोर होऊन लढावे लागेल असे स्पष्ट बोलून त्यांनी त्यांच्या दृष्टीने “सही दिशा स्पष्ट नीती” उघड केली आहे!!

Prime minister Narendra modi targets Dynasty politics in his BJP anniversary speech

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात