ओरिसा, बिहार, अरुणाचल प्रदेश सरकारांचा पेट्रोल-डिझेल ग्राहकांना दिलासा, व्हॅट केला कमी!!


वृत्तसंस्था

भुवनेश्वर : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील आयात शुल्कात अनुक्रमे 5.00 आणि 10.00 रुपयांची कपात केल्यानंतर विविध राज्य सरकारांनी त्यावर लावलेली मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट आपापल्या हिशेबानुसार कमी केले आहेत. यामध्ये ओरिसा बिहार आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांची भर पडली आहे.Orissa, Bihar, Arunachal Pradesh governments relieve petrol-diesel consumers, reduce VAT

काल उत्तर प्रदेश, गुजरात, आसाम, त्रिपुरा, उत्तराखंड आदी राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेल वरील मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅटमध्ये कमी केली होती. आज ओरिसा बिहार आणि अरुणाचल प्रदेश सरकारांनी 3.00 ते 4.00 रुपयांदरम्यान आपापल्या हिशेबाने व्हॅट कमी केला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावात 10.00 ते 15.00 रुपयांच्या रेंजमध्ये या तीनही राज्यांमध्ये घट झाली आहे.



ओरिसामध्ये 3.00 रुपयांनी, बिहारमध्ये 3.90 रुपयांनी मूल्यवर्धित कराच्या दरात घट करण्यात आली आहे. पण महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने मात्र अद्याप मूल्यवर्धित कर कमी करण्याचा निर्णय घेतलेला नाही. महाराष्ट्रातील पेट्रोल – डिझेलचे ग्राहक महाविकास आघाडी सरकारकडून कोणता दिलासा मिळतो याच्या प्रतीक्षेत आहेत.

Orissa, Bihar, Arunachal Pradesh governments relieve petrol-diesel consumers, reduce VAT

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात