प्रतिनिधी
मुंबई : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रॉफेट मोहम्मद यांच्याविषयी काढलेल्या कथित गैरउद्गारानंतर देशात दंगली भडकवण्याचा डाव उत्तर भारतात दिसून आला. त्याचे लोण महाराष्ट्र देखील पसरले. Nupur sharma : Muslims demonstrated on the streets in maharashtra
आज जुम्मा नमाजानंतर मुस्लीम समुदाय ठिकठिकाणी रस्त्यावर उतरला आणि त्यांनी नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
कर्नाटक: निलंबित भाजपा नेता नूपुर शर्मा के विवादित बयान के ख़िलाफ़ रजा अकादमी ने कलबुर्गी के मुस्लिम चौक पर प्रदर्शन किया। pic.twitter.com/P2iuJ8K4UK — ANI_HindiNews (@AHindinews) June 10, 2022
कर्नाटक: निलंबित भाजपा नेता नूपुर शर्मा के विवादित बयान के ख़िलाफ़ रजा अकादमी ने कलबुर्गी के मुस्लिम चौक पर प्रदर्शन किया। pic.twitter.com/P2iuJ8K4UK
— ANI_HindiNews (@AHindinews) June 10, 2022
दिल्लीतील जामा मशीद परिसरात निदर्शने झाल्यानंतर त्याचे लोण उत्तर प्रदेशात कानपुर लखनऊ, सहारनपुर, प्रयागराज आदी शहरांमध्ये पसरले. महाराष्ट्र देखील या निदर्शनांचे लोण पसरून सोलापूर, औरंगाबाद जालन्यात जमाव रस्त्यावर उतरला. अहमदनगर मध्ये मुस्लिम समाजाने बंद पुकारला. नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांना अटक करण्याची मागणी जमावाने प्रत्येक ठिकाणी केली आहे. नुपुर शर्मा विरोधात 59 ठिकाणी एफआयआर दाखल झाला आहे.
औरंगाबाद मधल्या मोर्चात एमआयएमचे खासदार इमतियाज जलील सामील झाले होते. सोलापूर मध्ये जमावाचे नेतृत्व एमआयएमच्या नेत्यांनी केले. यावेळी नुपूर शर्माविरोधात हिंसक घोषणाबाजी झाली. अनेक शहरांमध्ये प्रत्यक्ष पोलीस आयुक्तांना रस्त्यावर उतरून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करावे लागले.
– नेत्यांचे लक्ष राज्यसभा निवडणुकीकडे
मुंबईत राज्यसभा निवडणुकीचे घमासान आणि मतदान दिवसभर सुरू असताना महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मुस्लिमांची निदर्शने सुरू होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App