उत्तर प्रदेशातील मुस्लिमांच्या उध्दारासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने काम केले नाही,असदुद्दीन ओवेसी यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशातील मुस्लिमांच्या उद्धारासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने काम केलेले नाही असा आरोप ऑ ल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी केला आहे.No political party has worked for the salvation of Muslims in Uttar Pradesh, Asaduddin Owaisi alleges

उत्तर प्रदेशातील मुस्लिम: ‘डेव्हलपमेंट, सिक्युरिटी आणि इन्क्युजन’ च्या सादरीकरणादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ओवेसी म्हणाले, उत्तर प्रदेशातील मुस्लिमांवर अन्याय झाला आहे. राज्यातील कोणत्याही सरकारने मुस्लिमांच्या उद्धारासाठी काम केलेले नाही.



राजकीय पक्ष तुष्टीकरण करून आपली मते मिळवत राहिले. बदल व्हायलाच हवा. आम्ही हा अहवाल राज्यातील जनतेसमोर मांडू त्यानंतर जनताच ठरवेल की, त्यांचा वापर कोण करत आहे.ओवेसी यांनी हा हल्लाबोल थेट समाजवादी पक्षावर केला आहे.

उत्तर प्रदेशच्या यंदाच्या निवडणुकांत समाजवादी पक्षाला मुस्लिम मतांवर मोठा विश्वास आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचा फॉर्म्युला वापरत मुस्लिम मतांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा समाजवादी पक्षाचा प्रयत्न आहे.

त्यामुळे मुस्लिम समाजाच्या मतांमध्ये त्यांचे वाटेकरी होऊ पाहणाºया एआयएमआयएम या पक्षाला ते भाजपची बी टीम म्हणत आहेत. स्वत:ला मुस्लिमांचे मसिहा समजणाºया समाजवादी पक्षावर ओवेसी यांनी हल्लाबोल केल्याने उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

No political party has worked for the salvation of Muslims in Uttar Pradesh, Asaduddin Owaisi alleges

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात