सूरजागड प्रकल्प बंद झाला पाहिजे व मोदी सरकारच्या विरोधात विचार अशा आशयाचे बॅनर वाहने झाल्याचे ठिकाणी व गावाच्या वेशीवर बांधले होते. Naxals set fire to 9 tractors and 2 JCBs in Gadchiroli
विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास गडचिरोलीच्या भामरागडपासून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या इरपनार गावात नक्षल्यांनी १५ ट्रॅक्टर्स, दोन जेसीबी व एक ग्रेडरगाडी जाळून टाकल्याची खळबळजनक घटना घडली आहे.तसेच सूरजागड प्रकल्प बंद झाला पाहिजे व मोदी सरकारच्या विरोधात विचार अशा आशयाचे बॅनर वाहने झाल्याचे ठिकाणी व गावाच्या वेशीवर बांधले होते.
दुपारी २ ते २.३० च्या दरम्यान ४० ते ५० च्या संख्येने आलेल्या नक्षल्यांनी गावालगत खड्डा खणून त्यातील माती काढण्याचे काम करत असलेल्या कंत्राटदाराच्या ११ वाहनांना आग लावली.हा थरार दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला. जाळलेल्या वाहनांमध्ये ९ ट्रॅक्टर आणि २ जेसीबीचा समावेश आहे. यातील १० ते १५ बंदुकधारी पुढे येऊन त्यांनी ही आग लावली. या ठिकाणी लाल रंगाचा बॅनर लावून ते नंतर निघून गेले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App