MODI GOVERNMENTS DIWALI GIFT : मोदी सरकारच्या निर्णयानंतर तुमच्या शहरात पेट्रोलचा नेमका भाव काय?आजपासून किती रुपयांना मिळणार पेट्रोल?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारने (Modi Govt) जनतेला दिवाळीच्या (Diwali) मुहूर्तावर एक गिफ्ट दिलं आहे. मागील काही दिवसापासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर हे प्रचंड वाढले होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकाराने आता पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात ताबडतोब कपात केली आहे. त्यामुळे दिवाळीत सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.MODI GOVERNMENTS DIWALI GIFT: What is the exact price of petrol in your city after the decision of Modi government? How much will petrol cost from today?

सरकारने घेतलेला हा निर्णय उद्यापासून (4 नोव्हेंबर) संपूर्ण देशात लागू होणार आहे. यावेळी पेट्रोलवरचं उत्पादन शुल्क 5 रूपये तर डिझेलवरचं उत्पादन शुल्क 10 रूपयांनी कमी करण्यात आलं आहे.



दरम्यान, असं असलं तरी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात पेट्रोलचे वेगवेगळे दर आहेत. त्यामुळे राज्यातील कोणत्या शहरात पेट्रोल किती दर आहेत आणि सरकारच्या निर्णयानंतर पेट्रोल किती स्वस्त होणार हे पाहूयात सविस्तरपणे.

पेट्रोलचे आजचे (3 नोव्हेंबर) दर

  • अहमदनगर – 116.06
  • अकोला – 115.58
  • अमरावती – 116.96
  • औरंगाबाद – 117.37
  • भंडारा – 116.21
  • बीड – 116.76
  • बुलढाणा – 115.87
  • चंद्रपूर – 116.65
  • धुळे – 115.51
  • गडचिरोली – 117.06
  • गोंदिया – 117.39
  • बृहन्मुंबई (ग्रेटर मुंबई) – 115.85
  • हिंगोली – 116.89
  • जळगाव – 116.08
  • जालना – 117.41
  • कोल्हापूर – 115.91
  • लातूर – 116.64
  • मुंबई – 115.85
  • नागपूर – 115.65
  • नांदेड – 118.63
  • नंदुरबार – 116.35
  • नाशिक – 116.06
  • उस्मानाबाद – 116.81
  • पालघर – 116.07
  • परभणी – 118.16
  • पुणे – 115.66
  • रायगड – 116.35
  • रत्नागिरी – 117.89
  • सांगली – 116.04
  • सातारा – 116.35
  • सिंधुदुर्ग – 116.67
  • सोलापूर – 116.58
  • ठाणे – 115.69
  • वर्धा – 116.13
  • वाशिम – 116.47
  • यवतमाळ – 117.18

हे पेट्रोलचे 3 नोव्हेंबरचे दर आहेत. यामध्ये सरकारच्या निर्णयानंतर 5 रुपयांची कपात ही निश्चित आहे.

MODI GOVERNMENTS DIWALI GIFT: What is the exact price of petrol in your city after the decision of Modi government? How much will petrol cost from today?

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात