खंडणी मागण्यासाठी आरोपींनी केला मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर
विशेष प्रतिनिधी
पुणे : भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा वापर करून, तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी बांधकाम व्यावसायिकाला मागितल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. In the name of former mayor of Pune Muralidhar Mohol a ransom of three crores was demanded from the builder Both were arrested
या प्रकरणी संदीप पिरगोंडा पाटील आणि शेखर गजानन ताकवणे (वय ३५, रा. भालेकर चाळ, कर्वे रस्ता) या दोघांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला. हा प्रकार बांधकाम व्यावसायिकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
पौड रस्त्यावर संबंधित बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी पाटील, ताकवणे यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि त्यांचा मावसभाऊ रवी आटोळे यांच्या नावाचा वापर करून त्यांनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितली. भारतीय जनता पक्षाच्या युवा माेर्चाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी तीन कोटी रुपये हवे आहेत. पैसे न दिल्यास भविष्यात बांधकाम व्यवसायाला हानी पोहोचवू, अशी धमकी आरोपी पाटील आणि ताकवणे यांनी दिली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App