विशेष प्रतिनिधी
चंदीगड : पक्षांतर्गत नाराजीमुळे पंजाबमध्ये कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला. राजस्थानमध्ये सरकार पडण्याची भीती आहे. आता हरियाणा कॉंग्रेसमध्येही नाराजी नाट्य सुरू झाले आहे. माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे आमदार कुलदीप बिश्नोई यांनी हरयाणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद न दिले गेल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.In Punjab, Rajasthan and now Haryana too, MLA Kuldeep, Bhajanlal’s son, is angry with the Congress
माजी आमदार उदयभान यांना अध्यक्षपद दिले गेले आहे. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची बिश्नोई यांनी भेट घेतल्यावर त्यांनी ट्विटरवर बन गई बात, असे म्हटले होते. कुलदीप बिश्नोई राज्याचे माजी मुख्यमंत्री भजन लाल यांचे चिरंजीव आहेत. लोकसभा आणि विधानसभेत बिश्नोई अनेक वेळा निवडून गेले आहेत. कुमारी सैलजा यांच्या जागी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद दिले जाईल, अशी आशा होती; परंतु माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी ते पद आपले समर्थक उदयभान यांना मिळवून दिले.
नाराज बिश्नोई यांनी आपल्या समर्थकांना म्हटले की, नेते राहुल गांधी यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणतेही पाऊल टाकणार नाही. बिश्नोई यांंनी २००५ मध्ये वडील भजन लाल यांच्याऐवजी भूपेंद्र सिंह हुड्डा यांना मुख्यमंत्री बनवले गेल्यावर नाराज होऊन हरयाणा जनहित काँग्रेस स्थापन केला होता. त्याला काही लक्षणीय यश मिळाले नाही म्हणून त्यांनी २०१६ मध्ये आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला.
In Punjab, Rajasthan and now Haryana too, MLA Kuldeep, Bhajanlal’s son, is angry with the Congress
महत्त्वाच्या बातम्या
- राजसभेची जोरदार तयारी : पवार – ठाकरे, गडकरी – पवार “राजकीय भेटीगाठी”…!!
- पबजी गेम खेळण्यासाठी मोबाईल हवा म्हणून केली चोरी
- Raj Thackeray : संभाजीनगरात शिवसेनेविरुद्ध तोफा धडाडणार म्हणून इम्तियाज जलील खुश; राजना इफ्तारचे निमंत्रण!!
- औरंगाबादच्या सभेस जाण्याकरिता राज ठाकरेंची जय्यत तयारी -दाैऱ्यावर जाण्यापूर्वी १०० ते १५० गुरुजी देणार शुभाशीर्वाद