• Download App
    भारतात बेकायदेशिरपणे राहणाऱ्या रोहिंग्य मुसलमानांचा ‘न्यूज क्लिक’ला पुळका|News clicks fake news on Rohingya Muslims living illegally in India

    भारतात बेकायदेशिरपणे राहणाऱ्या रोहिंग्या मुसलमानांचा ‘न्यूज क्लिक’ला पुळका

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतात बेकायदेशिरपणे राहत असलेल्या रोहिंग्या मुसलमानांचा न्यूज क्लिक या तथाकथित लिबरल वृत्तस्थळाला पुळका आला आहे. एकट्या जम्मू- काश्मीरमध्ये दहा हजाराहून अधिक रोहिंग्या मुसलमान राहत आहेत. भारतात त्यांचा छळ होत असून त्यांना जंगलात लपून राहत असल्याचा दावा न्यूज क्लिकने केला आहे.News clicks fake news on Rohingya Muslims living illegally in India

    अमेरिकेतील काही कंपन्या आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित संस्थांकडून निधी मिळाल्याचा आरोप न्यूज क्लिकवर आहे. या प्रकरणीत यांच्यावर आयकर विभागाने कारवाईही केली होती. याच न्यूज क्लिने रोहिंग्या मुस्लिमांच्या निमित्ताने पुन्हा एकदा भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामीचा प्रयत्न सुरू केला आहे.



    न्यूज क्लिकने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडिओची सुरुवात रबिउल आलम नावाच्या व्यक्तीपासून होते. 2010 मध्ये म्यानमारच्या राखीन राज्यातून अवैधरित्या भारतात स्थलांतरित झाला होता. न्यूजक्लिकने आरोप केला आहे की आलम या रोहिंग्या निर्वासिताला जम्मू प्रदेशातील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांकडून छळवणूक आणि धमकावल्यामुळे त्याचे सामान विकण्यास भाग पाडले गेले.

    तो म्हणतो, नियती जिथे घेऊन जाईल तिथे आपण जाऊ. आम्ही आमच्या देशात परत जाऊ आणि तिथेच मरू. जम्मूमध्ये सुमारे 10,000 रोहिंग्या मुस्लिम बेकायदेशीरपणे राहत आहेत. गेल्या 2 वर्षात सुमारे 150 रोहिंग्या मुस्लिमांना व्हेरिफिकेशन ड्राईव्हमध्ये ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

    त्यानंतर न्यूजक्लिकने दावा केला की जम्मू पोलिसांनी आणखी एका बेकायदेशीर रोहिंग्या स्थलांतरिताला ताब्यात घेतले होते, ज्यामुळे त्याची पत्नी हाजरा खातून हिला एकूण 7 मुलांचे संगोपन करावे लागले. आमच्याकडे फक्त एक कमावणारा हात होता, माझा नवरा आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतले, असे ती म्हणत आहे.

    बेकायदेशीर रोहिंग्यांपैकी एकाने दावा केला की तो आणि त्याच्या कुटुंबाचा म्यानमारपेक्षा भारतात जास्त छळ होत आहे. निर्वासितांमध्ये अनिश्चितता आणि अटक आणि निर्वासित होण्याची भीती आहे. त्यामुळे बहुतेक निर्वासित त्यांच्या छावण्यांमध्येच बंदिस्त राहतात. काही जण अधिकाºयांपासून लपून जंगलात दिवस घालवतात.

    News clicks fake news on Rohingya Muslims living illegally in India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’