Turkey : पाकिस्तानला साथ देणे तुर्कीला किती महागात पडले? भारताच्या एका निर्णयाने ४,३०० कोटींचा फटका; आता कंपनीची पहिली कबुली
भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात पाकिस्तानच्या बाजूने उघडपणे उभे राहिलेल्या तुर्कीला त्याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागल्याचे आता समोर आले आहे. भारताने तुर्कीशी संबंधित विमानतळ सेवा कंपनीवर कारवाई केल्यानंतर तब्बल ४,३०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची कबुली कंपनीच्या प्रमुखांनी दिली आहे. विशेष म्हणजे, भारतातून बाहेर पडल्यानंतर जवळपास वर्षभराने कंपनीने पहिल्यांदाच या निर्णयामुळे झालेल्या फटक्याबाबत सार्वजनिकपणे भाष्य केले आहे.