विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा ३० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचा दौरा निश्चित झाला आहे.आपल्या प्रत्येक राज्यातील दौऱ्या त कॉँग्रेसच्या नेत्यांना गळाला लावणाऱ्या ममता बॅनर्जी महाराष्ट्रात खेला होबे करू नयेत अशी चिंता कॉँग्रेसला लागली आहे.In Maharashtra, congress is worried about Mamata Banerjee Khela Hobe, who will be the leader
ममता बॅनर्जी यांचे रणनितीकार प्रशांत किशोर यांनी ठरविलेल्या रणनितीनुसार देशातील विरोधी पक्षाची जागा तृणमूल कॉँग्रेसने घ्यावी असे ठरविले आहे. यासाठी वेगवेगळ्या राज्यांतील नेत्यांना तृणमूलमध्ये घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामध्येही सध्या गलितगात्र झालेल्या कॉँग्रेसमधील नेत्यांना गळाला लावण्याची रणनिती आखली आहे.
प्रशांत किशोर यांच्यासह ममतांची टीम एखाद्या राज्यात जाऊन चाचपणी करते. काही नेत्यांना गळाला लावते. त्यानंतर ममता बॅनर्जी त्या राज्याचा दौरा करून त्यांच्या उपस्थितीत पक्षांतराचे कार्यक्रम होतात. त्रिपुरा, गोवा आणि दिल्लीमध्ये हेच घडले होते. तेच महाराष्ट्रात होतेय का अशी चिंता कॉँग्रेसला लागली आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉँग्रेस सहभागी झालेली आहे. मात्र, शिवसेनेसोबतची कॉँग्रेसची आघाडी अनेक नेत्यांना पसंत नाही. प्रामुख्याने मुस्लिम मते निर्णायक असणाºया भागांतील कॉँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यामुळे नाराज आहेत. ममता बॅनर्जी यांनी मुस्लिम समाजाला आपल्याकडे वळविण्यात यश मिळविलेले असल्याने आता कॉँग्रेसमधील हे नेते तृणमूलमध्ये जाऊ शकतात.
कॉँग्रेस सत्तेत सहभागी असली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दयेवर आहे. अनेक जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे बडे नेते कॉँग्रेसच्या नेत्यांवर दादागिरी करत असल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे सत्तेचा कोणताही फायदा नसलेले नेते तृणमूलमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे कॉँग्रेसमध्ये धास्तीचे वातावरण आहे.
ममता बॅनर्जी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांना कॉँग्रेस कमकुवत झाली तर हवेच आहे.आपल्या दिल्ली दौºयात काँग्रेसमधील काही नाराज नेत्यांना ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये खेचून आणलेय. तेच महाराष्ट्रात करण्याचे तृणमूल कॉँग्रेसचे प्रयत्न आहेत.
In Maharashtra, congress is worried about Mamata Banerjee Khela Hobe, who will be the leader
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेसच मुख्य विरोधी पक्ष; संसदेत सर्व विरोधकांची एकजूट घडविण्याचा निर्धार!!
- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचा आणखी एक विक्रम, कमी खर्चाचा, कमी वजनाचा देशातील पहिला पूल लातूरमध्ये
- कॉँग्रेसचा बंगळुरूमधील भंगारवाला देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार, १७०० कोटींहून अधिक संपत्ती, शिक्षण केवळ पाचवी
- मतांनी नव्हे तर लष्कराच्या पाठिंब्याने इम्रान खान सत्तेवर, नवाझ शरीफ यांना भ्रष्टाराचाच्या जाळ्यात अडकविण्याचाही कट