नेताजींच्या गुप्त फाइल्स केंद्राने खुल्या केल्यास नाहीत; ममता बॅनर्जी यांचे टीकास्त्र


वृत्तसंस्था

कोलकत्ता : देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित गुप्‍त फाइल्स पश्चिम बंगाल सरकारने खुल्या केल्या पण केंद्रामध्ये आज असलेल्या सरकारने त्या खुल्या केल्या नसल्याचे टीकास्त्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोडले आहे. If Netaji’s secret files are not opened by the Center

केंद्राला पश्चिम बंगाल विषयी आकस आहे. त्यामुळे पश्चिम बंगालचा चित्ररथ देखील त्यांनी 26 जानेवारी च्या कार्यक्रमात नाकारला आहे. असा आरोप ममाता बॅनर्जी यांनी केला आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीच्या राज्य सरकारच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नेताजी सुभाष चंद्र बोस स्टेडियममध्ये हा भव्य कार्यक्रम झाला. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या संदर्भातल्या गुप्त फाईल्स खुल्या करण्याचे आश्वासन आज केंद्र सरकार मध्ये असलेल्या नेत्यांनी दिले होते. परंतु हे आश्वासन त्यांनी पाळलेले नाही. गेली सात वर्षे केंद्र सरकारने आपल्या ताब्यात असलेल्या फाइल्स खुल्या केल्या नाहीत. पश्चिम बंगाल राज्य सरकारच्या ताब्यात असलेल्या सर्व फाइल्स आज खुल्या करण्यात आल्या आहेत. अभ्यासकांसाठी त्या उपलब्ध आहेत, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

पश्चिम बंगालसह देशभर सर्वत्र नेताजींची 125 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. संसदेच्या केंद्रीय सभा कक्षात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि अन्य नेत्यांनी आदरांजली वाहिली.

If Netaji’s secret files are not opened by the Center

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात