Updates हेलिकॉप्टर दुर्घटना : बिपीन रावत त्यांच्या पत्नीसोबत प्रवास करत होते, जाणून घ्या हेलिकॉप्टरमध्ये कोण-कोण होते उपस्थित?

Helicopter Crash in Connoor CDS Bipin Rawat was traveling with his wife, know who was present in the helicopter

Helicopter Crash in Connoor CDS Bipin Rawat : तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत उपस्थित होते. तामिळनाडूतील ज्या भागात बुधवारी हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले, तो पूर्णपणे जंगली भाग आहे. हेलिकॉप्टर अपघातानंतर आजूबाजूला धुराचे लोट उठत आहेत. Helicopter Crash in Connoor CDS Bipin Rawat was traveling with his wife, know who was present in the helicopter


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत उपस्थित होते. तामिळनाडूतील ज्या भागात बुधवारी हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले, तो पूर्णपणे जंगली भाग आहे. हेलिकॉप्टर अपघातानंतर आजूबाजूला धुराचे लोट उठत आहेत. स्थानिकांनीही मदत कार्यात उडी घेतली आहे.

हे Mi-17V5 हेलिकॉप्टर होते, ज्यामध्ये CDS बिपिन रावत यांच्यासह 14 लोक होते. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तीन जणांना वाचवण्यात यश आले असून सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या हेलिकॉप्टरमध्ये बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका रावतही होत्या. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये बिपिन रावत, त्यांची पत्नी, एक ब्रिगेडियर दर्जाचा अधिकारी, आणखी एक अधिकारी आणि दोन पायलट उपस्थित होते.

सीडीएस बिपिन रावत यांच्यासोबत दिल्ली ते सुलूर प्रवास करणाऱ्या लोकांची ही यादी आहे. मात्र, त्यावेळी या हेलिकॉप्टरमध्ये किती लोक होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या हेलिकॉप्टर दुर्घटनेतून आतापर्यंत तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार हा अपघात खराब हवामानामुळे झाला आहे. जखमींना आता जवळच्या लष्कराच्या वेलिंग्टन तळावर उपचारासाठी नेण्यात आले आहे.

या अपघाताबाबत हवाई दलाचे अधिकृत वक्तव्यही आले आहे. वायुसेनेच्या म्हणण्यानुसार, ज्या एमआय-१७व्ही५ हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपिन रावत होते त्याचा कुन्नूरमध्ये अपघात झाला आहे.

Helicopter Crash in Connoor CDS Bipin Rawat was traveling with his wife, know who was present in the helicopter

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती