विशेष प्रतिनिधी
बंगळूर – राजधानी बंगळूरसह कर्नाटकमध्ये अनेक शहरांमध्ये पाऊस कोसळल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरले होते. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कर्नाटकात अवकाळी पाऊस कोसळत आहे.Heavy rain in Karanataka
बंगळूरमध्ये अनेक ठिकाणी मोटारी अर्ध्या पाण्याखाली गेल्या होत्या. बंगळूरमध्ये रात्रभर पाऊस कोसळल्याने शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव ओसंडून वहात आहेत. बंगळूरच्या उत्तर भागात अनेक ठिकाणी पाणी साचून राहिल्याने नागरिकांचे हाल झाले.
येलाहंका भागात काल दिवसभरात १५३ मिमी पाऊस कोसळला. जोरदार पावसामुळे चेन्नईतील औद्योगिक भाग असलेल्या मनालीमध्येही अनेक घरांमध्ये पाणी शिरले. कोसास्थलैयार नदीला पूर आल्याने चेन्नईच्या उत्तर भागाला फटका बसला.
याशिवाय, आंध्र प्रदेशातील चित्तूर येथेही गेल्या काही दिवसांपासून पाऊस कोसळत असल्याने त्याचा परिणाम म्हणून तमिळनाडूतील थिरुवल्लूर जिल्ह्यातल्या पुंडी जलसाठ्यातील पाण्यात वाढ झाली आणि तो ओसंडून वाहू लागला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App