विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :मुंबई : Gold Import Duty सोन्याच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे. सोन्यावरील आयात शुल्कामध्ये कपात करण्याचा प्रस्ताव वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने सादर करण्यात आला होता त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.त्याचा परिणाम थेट सोन्यासंबंधीचे शेअर आणि ज्वेलरी शेअरवर दिसून आला.GOLD NEWS! Gold will be cheaper; Lower import duties; Decision of the Ministry of Commerce; Read detailed
सध्या सोन्यावर 7.5 टक्के आयात शुल्क मोजावे लागते. सोबतच 2.5 टक्क्यांचा कृषी सेस (Agriculture Cess) वेगळा आकारला जातो. त्यामुळे सोन्यावर एकूण 10 टक्के आयात शुल्क मोजावे लागते.
हे 10 टक्के आयात शुल्क वाचाविण्याच्या नादात सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात देशात सुरु आहे. देशात येणा-या एकूण सोन्यात तस्करीने येणारे सोने 25 टक्के इतके आहे.
सर्वसामान्यांना काय ?
देशात सोन्याच्या किंमतीत जी अचानक उसळी आली होती. ती स्थिर होण्याची चिन्हे दिसतील. आज पन्नाशीच्या आसपास असलेले सोनं काही अंशी तरी घसरेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App