याला म्हणतात काँग्रेस : कर्नाटकात मोफत विजेच्या पोकळ घोषणा; प्रत्यक्षात वीज ग्राहकांवर दरवाढीचा बोजा!!

वृत्तसंस्था

बेंगलोर : कर्नाटकात काँग्रेसने सत्तेवर येण्यासाठी एकापाठोपाठ एक मोफत योजना जाहीर केल्या पण त्या योजना पूर्ण करण्यासाठी काँग्रेस सरकारला दरवर्षी 65000 कोटी रुपयांचा बोजा सहन करायला लागेल हे पाहिल्यावर तिथल्या सरकारचे डोळे पांढरे झाले आहेत. त्यामुळे आता सगळ्या मोफत योजनांच्या आडून काँग्रेस सरकारने सगळ्या सार्वजनिक सेवांचे दर वाढविण्याचाच धडाका लावला आहे. Free electricity hollow announcements in Karnataka

कर्नाटकात सत्तेवर येण्यासाठी काँग्रेसने राज्यातल्या सर्व नागरिकांना 200 युनिट पर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केली. पण सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांचे सरकार सत्तेवर येऊन 15 दिवसही उलटले नाहीत, तोच वीजदर वाढही जाहीर केली. ही दरवाढ या महिन्यापासूनच म्हणजे जून पासूनच लागू होणार आहे.

त्यामुळे आता प्रत्येक ग्राहकाला 200 युनिटच्या वरच्या वीज खरेदीसाठी प्रत्येक युनिटला 2 रुपये 89 पैसे जास्त खर्च करावे लागणार आहेत. याचा अर्थ 200 युनिट पर्यंतची वीज ग्राहकांना मोफत मिळेल पण त्या पुढचा प्रत्येक युनिट मात्र ग्राहकाधा वाढीव खर्चाचा भुर्दंड सोसावा लागेल.

Free electricity hollow announcements in Karnataka

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात