योगींचे लोकसंख्या नियंत्रण धोरण काँग्रेसला टोचले; मंत्र्यांची वैध – अवैध मुले मोजा मग धोरण राबवा, सलमान खुर्शीद म्हणाले


वृत्तसंस्था

लखनौ – उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०२१ – ३० या १० सालांपर्यंतचे लोकसंख्या नियंत्रण धोरण जाहीर केले. पण ते काँग्रेसला चांगलेच टोचलेय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सलमान खुर्शीद हे त्या धोरणाला उघ़डपणे विरोध करण्याचे धैर्य तर दाखवू शकले नाहीत. First, (the govt) has to inform how many children do ministers have. After that, this act should be implemented. Legitimate & illegitimate children should also be counted

पण सलमान खुर्शीद यांनी खोचकपणे हे धोरण कसे राबवावे याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, की योगी सरकारने लोकसंख्या धोरण राबवायला हरकत नाही. पण त्यांच्या सरकारमधल्या मंत्र्यांनी पहिल्यांदा हे जाहीर करायला हवे, त्यांना मुले किती. त्यानंतर लोकसंख्या नियंत्रण धोरण लागू करावे. मंत्र्यांच्या वैध आणि अवैध दोन्ही प्रकारच्या मुलांची संख्या मोजून जाहीर करावी आणि खुशाल धोरण राबवावे, असा सल्ला सलमान खुर्शीद यांनी फारूखाबाद येथे दिला.



आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने योगी सरकारने राज्यात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणून तो कठोरपणे राबविण्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये ऐच्छिक नसबंदीला प्रोत्साहन, दोन पेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना सरकारी सवलती, योजना बंद, त्यांना सरकारी नोकरीत बंदी, रेशनकार्डावर फक्त चारच व्यक्तींना धान्य मिळणार वगैरे तरतूदींचा समावेश आहे.

मुसलमान समाजाला टार्गेट करण्यासाठी योगी सरकार लोकसंख्या नियंत्रण धोरण आणत आहे, असा आरोप समाजवादी पक्षाने देखील केला आहे.

First, (the govt) has to inform how many children do ministers have. After that, this act should be implemented. Legitimate & illegitimate children should also be counted

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात