प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात आता अशी व्यवस्था करण्याची वेळ आली आहे की एक व्यक्ती एकच टर्म पंतप्रधान बनेल. दुसऱ्या टर्मची संधी दुसऱ्या व्यक्तीला मिळेल, पण एकाच व्यक्तीला एकापेक्षा अधिक टर्म पंतप्रधानपदावर राहण्याचा अधिकार असता कामा नये. राजा महाराजांचा काळ गेला. तो आपण विसरला पाहिजे, असे वक्तव्य केले आहे, प्रख्यात लेखिका आणि बुकर पुरस्कार विजेते अरुंधती रॉय यांनी…!!Finally Liberals have come up with a way to stop Modi from becoming PM in 2024.
हे वक्तव्य करण्यासाठी त्यांनी ठिकाण निवडले दिल्ली प्रेस क्लबचे आणि दिवस निवडला जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात कथित पोलीस लाठी हल्ल्याच्या स्मरण दिनाचा. याच दिवशी दोन वर्षांपूर्वी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठात सीएए – एनआरसी विरोधात कथित आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. त्याच्या स्मरण कार्यक्रमात या कार्यक्रमात अरुंधती रॉय सहभागी झाल्या होत्या.
Finally Liberals have come up with a way to stop Modi from becoming PM in 2024. Arundhati Roy demands that one person can only be PM for one term. 😂 pic.twitter.com/kJWRepKUex — Ankur Singh (Modi Ka Parivar) (@iAnkurSingh) December 17, 2021
Finally Liberals have come up with a way to stop Modi from becoming PM in 2024.
Arundhati Roy demands that one person can only be PM for one term. 😂 pic.twitter.com/kJWRepKUex
— Ankur Singh (Modi Ka Parivar) (@iAnkurSingh) December 17, 2021
अरुंधती रॉय म्हणाल्या, की आपण लोकशाहीवादी देशात राहत असू तर आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की या देशात कोणीही व्यक्ती एका टर्म पेक्षा अधिक काळ पंतप्रधानपदावर राहता कामा नये. दुसऱ्या टर्मला दुसरी व्यक्ती पंतप्रधान झाली पाहिजे. त्यामुळे आपण देशातली लोकशाही व्यवस्था टिकवू शकतो. सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जे अत्याचार केले, त्यामागे विशिष्ट प्रवृत्ती होत्या आणि त्या आपल्याला लोकशाही मानणाऱ्या भारतातून नाहीशा करायच्या आहेत.
– अरुंधती रॉय ट्रोल
अरुंधती रॉय यांनी एक टर्म पंतप्रधानाची सूचना करताच सोशल मीडियात त्यावर विविध क्रिया -प्रतिक्रिया उमटल्या असून अखेर असा लिबरल्सचा खरा चेहरा उघड झाला. लिबरल्स लोकांना नेमके कोण खटकते आहे, हे लक्षात आले, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी अरूंधती रॉय यांना ट्रोल केले आहे.
जनतेने निवडून दिलेले पंतप्रधान अरुंधती रॉय यांना नको आहेत का? असे सवालही अनेकांनी केले आहेत. या खेरीज अरुंधती रॉय यांनी या कार्यक्रमांमधून अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली आहे. तो कार्यक्रम जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचा असल्याचेही अनेकांनी आवर्जून निदर्शनास आणून दिले आहे. त्याच वेळी फक्त नरेंद्र मोदी हेच टर्म पंतप्रधान झालेत का? मग बाकीचे दोन-तीन टर्म पंतप्रधान झाले त्यांचे काय?, त्यावेळी तुम्ही एक टर्म पंतप्रधानाची का नाही सूचना केल्यात?, असे खोचक सवालही अनेकांनी अरूंधती रॉय यांना केले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App