प्रसिद्ध यूट्यूबर आणि अभिनेता भुवन बाम सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. अलीकडेच त्याच्या एका व्हिडिओवरून वाद निर्माण झाला होता. भुवनने महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. जेव्हा हे प्रकरण वाढले तेव्हा राष्ट्रीय महिला आयोगाने त्याची दखल घेतली, त्यानंतर भुवन बामने माफी मागितली आहे. व्हिडिओ एडिट करून वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.Famous YouTuber Bhuvan Bamla Mahagat for making offensive remarks about women, National Women’s Commission apologizes after taking notice
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : प्रसिद्ध यूट्यूबर आणि अभिनेता भुवन बाम सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. अलीकडेच त्याच्या एका व्हिडिओवरून वाद निर्माण झाला होता. भुवनने महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. जेव्हा हे प्रकरण वाढले तेव्हा राष्ट्रीय महिला आयोगाने त्याची दखल घेतली, त्यानंतर भुवन बामने माफी मागितली आहे. व्हिडिओ एडिट करून वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
भुवन म्हणाला, मी महिलांचा आदर करतो आणि माझा असा कोणताही हेतू नव्हता. त्याने गेल्या आठवड्यात त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. ‘ऑटोमॅटिक व्हेईकल’ नावाने हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून, तो आतापर्यंत 1 कोटी 24 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
व्हिडिओमध्ये भुवन बामने पहाडी महिलांबद्दल दि्वअर्थी संवाद केला होता. राष्ट्रीय महिला आयोगाने ट्विट करून दिल्ली पोलिसांना कॉमेडियनविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
I’m aware that a section in my video has hurt some people. I have edited it to remove that part. People who know me know I have utmost respect for women. I had no intention to hurt anyone. A heartfelt apology to everyone whose sentiments have been disregarded. @NCWIndia — Bhuvan Bam (@Bhuvan_Bam) March 31, 2022
I’m aware that a section in my video has hurt some people. I have edited it to remove that part. People who know me know I have utmost respect for women. I had no intention to hurt anyone. A heartfelt apology to everyone whose sentiments have been disregarded. @NCWIndia
— Bhuvan Bam (@Bhuvan_Bam) March 31, 2022
ट्विट करून मागितली माफी
भुवन बामने लिहिले की, ‘मला समजले की माझ्या व्हिडिओच्या एका भागामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. तो भाग काढण्यासाठी मी एडीट केला आहे. जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे की मला महिलांबद्दल खूप आदर आहे. कुणालाही दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची मी मनापासून माफी मागतो. पहाडी महिलांचा उल्लेख असलेला 4 सेकंदांचा भाग आता काढून टाकण्यात आला आहे.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App