वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने अवजड आणि मध्यम वाहतूक करणारी सर्व विमाने युद्धपातळीवर सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. Equipped Air Force Covid Warriors; Heavy transport aircraft ready 24 hours a day
कोविड-१९ शी संबंधित कामांसाठी अवजड वाहतूक करणाऱ्या विमानांची कोणत्याही क्षणी गरज भासू शकते. त्यामुळेविमाने २४ तास सज्ज ठेवण्याचा आदेश भारतीय हवाई दलाने दिला आहे, असे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी सांगितले.
देशातील सर्व भूप्रदेशांसाठी हवाई दल मोठ्या तसेच मध्यम आकाराची विमाने तैनात करत आहे , असे भदौरिया यांनी मोदी यांना सांगितल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय हवाई दलाने स्थापन केलेल्या ‘कोविड एअर सपोर्ट सेल’ बाबतही हवाई दल प्रमुखांनी पंतप्रधानांना माहिती दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App