वृत्तसंस्था
नागपूर : मेट्रोसाठी अॅल्युमिनियम कोचच्या निर्मितीमुळे मेक इन इंडियाचे स्वप्न साकार होत आहे. मेट्रोसाठी अॅल्युमिनियम कोच पुण्याकडे रवाना देखील करण्यात आले आहेत. Due to the manufacture of Aluminium coaches for the metro Make in India dream come true: Departure for Pune
अॅल्युमिनियमपासून निर्मित पहिली मेट्रो ट्रेन पुणे येथील प्रकल्पाकरिता शनिवारी रवाना केली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारच्या अॅल्युमिनियम कोचचे निर्माण होत आहे.
कोलकातामधील उत्तरपरा येथे टिटागड वॅगन्स या कंपनीतर्फे आयोजित सोहळ्यात केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाचे सचिव आणि महामेट्रोचे अध्यक्ष मनोज जोशी यांनी हिरवा झेंडा दाखवत ट्रेन पुणे मेट्रो प्रकल्पाकरिता रवानगी केली. याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी जयदीप, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर उपस्थित होते. मनोज जोशी म्हणाले, ‘मेट्रो प्रकल्पांमुळे एक नवीन इको-सिस्टीम निर्मित होत आहे. अॅल्युमिनियम कोचच्या निर्मितीमुळे यापुढे मेक इन इंडियाचे स्वप्न साकार होत आहे. ‘ डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, ‘वजनाने हलक्या असलेला मेट्रोच्या कोचचे निर्माण होणे आणि त्याचा मेट्रो प्रकल्पाकरता वापर होणे ही संपूर्ण देशाकरता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App