ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे आझाद मैदानावर आंदोलनासाठी आता वेळेची मर्यादा

 

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याच सोबत सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर देखील निर्बंध लावण्यात आले आहेत.  Due to the increasing contagion of Omaicron, now is the time limit for agitation on Azad Maidan


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने हाहाकार माजवला आहे.दरम्यान कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याच सोबत सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर देखील निर्बंध लावण्यात आले आहेत. याचा सरळ सरळ परिणाम आझाद मैदानावर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर देखील होत असल्याचे दिसत आहे.



आझाद मैदानावर मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या नियमावलीनुसार आता या कर्मचाऱ्यांना संध्याकाळी ५ ते पहाटे ५ पर्यंत आझाद मैदान सोडावं लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले की,”आम्ही संध्याकाळी ५ ते पहाटे ५ पर्यंत आझाद मैदानातू बाहेर पडणार आहोत. मात्र, पाहाटे ५ वाजता आम्ही पुन्हा एकदा आझाद मैदानावर दुखवटा पाळणार आहे .तसेच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याशी आमची चर्चा झाली. त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. त्याच सोबत आमची बाहेर राहण्याची आणि खाण्याची सोय झाल्याचंही कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

Due to the increasing contagion of Omaicron, now is the time limit for agitation on Azad Maidan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात