Liquor Policy Case: ‘आप’ नेते मनीष सिसोदिया यांना दिलासा नाही, न्यायालयीन कोठडी १ जूनपर्यंत वाढवली

Manish Sisodia

भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मनीष सिसोदिया दीर्घकाळ तुरुंगात आहेत

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीतही दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिलासा मिळाला नाही. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १ जूनपर्यंत वाढ केली आहे.Delhi’s Rouse Avenue Court extends the judicial custody of AAP leader and former Delhi Deputy CM Manish Sisodia till June 1

दिल्लीतील नवीन उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मनीष सिसोदिया दीर्घकाळ तुरुंगात आहेत. अशा परिस्थितीत आता न्यायालयाने दिलेल्या या आदेशाने त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. मात्र, त्यांना दिलासा देण्यासाठी न्यायालयाने तुरुंग अधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी वाढविण्याबरोबरच वाचनासाठी खुर्ची आणि टेबल उपलब्ध करून देण्याच्या त्याच्या विनंतीवर विचार करण्याचे निर्देश दिले.

यापूर्वी, दिल्ली न्यायालयाने मनीष सिसोदिया आणि इतर तिघांविरुद्ध सीबीआयच्या पुरवणी आरोपपत्रावरील आपला आदेश राखून ठेवला होता. सिसोदियाशिवाय अर्जुन पांडे, बुची बाबू गोरंटला आणि अमनदीप ढल यांचीही आरोपपत्रात नावे आहेत.

Delhis Rouse Avenue Court extends the judicial custody of AAP leader and former Delhi Deputy CM Manish Sisodia till June 1

 

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात