Delhi Police Notice Rahul Gandhi : राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी पाठवली नोटीस; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

Rahul gandhi

राहुल गांधींच्या सोशल मीडियावरील वक्तव्याची दखल घेत दिल्ली पोलिसांनी आता राहुल गांधींना काही प्रश्न पाठवले आहेत.

विशेष प्रतिनिधी

दिल्ली पोलिसांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान ज्या पीडितांचा उल्लेख केला होता त्या पीडितांची माहिती देण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे. Delhi Police issues a notice to Congress MP Rahul Gandhi


फिरून फिरून भोपळे चौक; राहुल गांधी भारतात परतले; अदानी वरून पुन्हा सुरू झाले!!


लैंगिक छळाच्या प्रकरणी संरक्षणाची अपेक्षा ठेवून त्यांनी माझी भेट घेतली होती, असं राहुल गांधी  म्हणाले होते. यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी महिलांच्या छेडछाडीबाबत इतरही अनेक विधाने केली होती.

या विधानांबाबत दिल्ली पोलिसांनी आता राहुल गांधींना काही प्रश्नांच्या स्वरूपात नोटीस पाठवून उत्तरे मागितली आहेत. राहुल गांधींनी जम्मू-काश्मीरमध्ये विधान केले होते की, “मी एका बलात्कार पीडितेला भेटलो होतो, त्यावेळी मी त्या मुलीला विचारले की आपण पोलिसांना फोन केला पाहिजे का?, तेव्हा तिने असे सांगून फोन करण्यास नकार दिला की, तिला अपमानाला सामोरे जावे लागेल.

Delhi Police issues a notice to Congress MP Rahul Gandhi

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात