Jahangirpuri Violence : #दिल्ली के बुलडोजर भैया ट्विटर वर टॉप ट्रेंडिंग मध्ये!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीतील जहांगीरपुरीतील हनुमान जयंतीची दंगल आणि त्यानंतर आजची बुलडोजर कारवाई देशभरात राजकीय चर्चेचा विषय बनली असून ट्विटर सारख्या सोशल मीडियावर देखील त्याचा बोलबाला जोरात सुरू आहे. जहांगीरपुरी मध्ये आज सकाळी 10.00 वाजल्यापासून दीड तास 9 बुलडोझर चालले. डझनभर अतिक्रमणे हटवली. देशभरात त्या मुद्यावरून जोरदार चर्चा उफाळून आली. Delhi K Bulldozer Bhaiya in Top Trending on Twitter

सोशल मीडियावर #Bulldozer, #दिल्लीकेबुलडोजर_भैया, #StopBulldozingMuslimHouses हे तीन हॅशटॅग जोरदार चालले. बुलडोजर कारवाईविरोधात जमियात उलेमा ए हिंद सुप्रीम कोर्टात गेली आहे. सुप्रीम कोर्टाने जहांगीरपुरी भागातील बुलडोजर कारवाई तात्पुरती स्थगित करायचे आदेश दिले आहेत.

परंतु या आदेशानंतर देखील बुलडोजर कारवाई थांबलेली दिसली नाही. बुलडोजरने जहांगीरपुरीतील जामा मशिदीचे अतिक्रमण तोडले. त्याचबरोबर अन्य ठिकाणची अतिक्रमण देखील तोडण्यात आली आहेत. जहांगीरपुरी भागात बुलडोजर कारवाई सुरू असताना सुमारे 400 पोलिस तैनात होते. प्रचंड जमाव जमला होता. परिस्थिती तणावपूर्ण असली तरी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 9 बुलडोजरनी सुमारे एक डझन भर अतिक्रमणे हटविण्यात आली. परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नंतर कारवाई थांबवण्यात आली.

मात्र दरम्यानच्या काळात आज दिवसभर दिल्ली के बुलडोजर भाई, तसेच बुलडोझर आणि मुस्लिमांविरुद्ध बुलडोजर कारवाई थांबवा अशा आशयाची ट्विट सारख्या सोशल मीडियावर जोरदार फिरत होती.

 

Delhi K Bulldozer Bhaiya in Top Trending on Twitter

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात