समाजवादी पक्षाच्या अजब घोषणेमुळे टीकेचे मोहोळ, म्हणे सायकलवर अपघात झाल्यास पाच लाख रुपयांची मदत

समाजवादी पक्ष आपले सायकल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. यातूनच पक्षाने एक अजब घोषणा केली असून त्यामुळेच टीकेचे मोहोळ उठले आहे. सायकलवर अपघात झाल्यास पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा या टीकेचे कारण होत आहे.Criticism over Samajwadi Party’s bizarre announcement: Rs 5 lakh assistance in case of bicycle accident


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : समाजवादी पक्ष आपले सायकल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. यातूनच पक्षाने एक अजब घोषणा केली असून त्यामुळेच टीकेचे मोहोळ उठले आहे. सायकलवर अपघात झाल्यास पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा या टीकेचे कारण होत आहे.

समाजवादी पक्षाची ही घोषणा सोशल मीडियावर आता ट्रोल होऊ लागली आहे. लोकं या घोषणेवरुन पक्षावर टीका करु लागले आहेत. एका यूजरने म्हटलं की, 5 लाख रुपयांसाठी अनेक लोकं आपल्या आजोबा किंवा दुसºया वृद्ध व्यक्तींना मारु शकतात. एकाने असे म्हटले आहे की, अरे भाऊ, असं काही करा ज्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढेल. सायकलने कोणी जावू नका…’



उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी अखिलेश यादव दररोज सभा घेत आहेत. लोकांकडे ते संधी मागत आहेत. त्यातूनच त्यांनी ही घोषणा केली आहे. मात्र, लोकांसाठी विकासात्मक करण्याऐवजी अशा प्रकारच्या घोषणा करून समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशाला मागासच ठेऊ इच्छित आहे, असे देखील म्हटले जात आहे.

कानपूरमध्ये मंगळवारी जनसभेला संबोधित करताना पीएम नरेंद्र मोदी यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीकास्त्र सो़डलं. ‘काही दिवसांपूर्वी भरभरुन नोटा मिळाल्या. जगाला माहित आहे या भ्रष्ट कामामागे कोणाचा हात आहे. त्यांनीच 2017 च्या आधी भ्रष्टाचाराचं हे सत्र संपूर्ण यूपीमध्ये पसरवलं आहे. आता भाजप सरकार ही घाण साफ करत आहे. हेच यूपीचं सत्य आहे आणि जनता हे समजत आहे.

Criticism over Samajwadi Party’s bizarre announcement: Rs 5 lakh assistance in case of bicycle accident

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात