मुख्यमंत्री हिमंता यांचा दावा, आसाममधून यावर्षी ‘AFSPA’ हटवण्यात येईल

Assam CM Himanta Biswa Sarma To Bring Anti Love Jihad Law in state Says Hindu Boy Lying To Hindu Girl Is Jihad

ईशान्येकडील राज्यांमध्ये AFSPA हटवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत.

विशेष प्रतिनिधी

दिसपूर :  आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी AFSPA बाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की 2023 च्या अखेरीस राज्यातून AFSPA पूर्णपणे मागे घेण्यात येईल. Chief Minister Himanta claims, ‘AFSPA’ will be removed from Assam this year

ट्विटमध्ये याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, 2023 च्या अखेरीस आम्ही राज्यातील AFSPA पूर्णपणे हटवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी पोलीस दलाला विशेष प्रशिक्षण देण्यासाठी माजी सैनिकांची मदत घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे ईशान्येकडील राज्यांमध्ये AFSPA हटवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. गेल्या वर्षी नागालँडमध्ये AFSPA हटवण्याच्या मागणीने जोर पकडला होता. यादरम्यान लष्कराच्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला. नंतर येथे प्रचंड हिंसाचार झाला. या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला.

  1. आसाम: राज्यात 1990 पासून संपूर्ण प्रदेशात AFSPA लागू करण्यात आला. आतापर्यंत 23 जिल्ह्यांतून तो पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे. तो अंशतः फक्त एकाच जिल्ह्यात लागू आहे.
  2. नागालँड: येथे 1995 पासून संपूर्ण क्षेत्र कायदा लागू आहे. येत्या शुक्रवारपासून सात जिल्ह्यांतील 15 पोलिस ठाण्यांमधून तो हटवण्यात येणार आहे.
  3. मणिपूर: राज्याची राजधानी इंफाळमधील सात भाग वगळता संपूर्ण प्रदेशात AFSPA 2004 पासून लागू आहे. आता तो 6 जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांमधून हटवण्यात आला आहे.

AFSPA म्हणजे काय? –

अशांत भागात AFSPA (सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा) लागू केला जातो. अशा भागात सुरक्षा दलांना कोणत्याही वॉरंटशिवाय कोणालाही अटक करण्याचा अधिकार आहे. अनेक बाबतीत बळाचाही वापर केला जातो. हा कायदा 11 सप्टेंबर 1958 रोजी ईशान्येतील सुरक्षा दलांना मदत करण्यासाठी मंजूर करण्यात आला. 1989 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळली, म्हणून 1990 मध्ये येथे AFSPA लागू करण्यात आला.

Chief Minister Himanta claims AFSPA will be removed from Assam this year

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात