वृत्तसंस्था
वाराणसी : ज्ञानव्यापी मशिद ही काशी विश्वेश्वराचे मंदिर तोडून उभारली आहे का ? याचा शोध घेण्याचे आदेश नुकतेच वाराणासी न्यायालयाने आर्किओलॉजिकला सर्व्हे ऑफ इंडियाला दिले आहेत. Buried under the Jama Masjid at Agra Find the idol of Lord Krishna Archaeological Survey of India
त्याच धर्तीवर आग्रा येथील जामा मशिदीचीही रेडिओलॉजिद्वारे चाचणी करावी, असे आदेश मथुरा न्यायालयाने आर्किओलॉजिकला सर्व्हे ऑफ इंडियाला द्यावेत. या सर्व्हेद्वारे जामा मशिदी खाली कृष्णाच्या मूर्ती पूरल्या आहेत का ? याचा शोध घेण्यास मदत होणार आहे,असे याचिकेत नमूद आहे.
मुघल राजा औरंगजेब याने मथुरेतील कृष्ण जन्मभूमीवरील मंदिर तोडले. तेथील कृष्णाच्या मूर्ती आग्र्याला सोबत नेल्या आणि जहाँनारा मशिद ( जामा मशिदीखाली ) पूरल्या, अशी याचिका मनीष यादव यांनी दाखल केली होती.
यादव हे कृष्णाचे वंशज असून त्यांनी वकील शैलेंद्र सिंग यांच्यातर्फे न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी कृष्ण जन्मभूमी शेजारी उभारलेली शाही इदगाह मशिद ताबडतोब हटविण्याची मागणी केली आहे. औरंगजेबाने कृष्ण जन्मभूमीवर हल्ला केला आणि तेथील मंदिर पाडले. तेथील मूर्ती जामा मशिदीच्याखाली पुरल्या आहेत. त्यामुळे त्यांचा शोध घेण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, असे याचिकेत नमूद केले आहे.
इतर बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App