मशिदीच्या भिंतीवर ‘जय श्री राम’ लिहिणारे गुन्हेगार मुस्लिम असल्याचे तपासात निष्पन्न

वृत्तसंस्था

हैदराबाद : तेलंगण राज्यातील भैंसा येथे काही दिवसांपूर्वी एका मशिदीच्या ‘भिंतीवर जय श्रीराम’ असे लिहिल्यामुळे गदारोळ उडाला होता. परंतु, हा प्रकार दोन मुस्लिम मुलांनीच केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाले आहे. Bhainsa: Culprit who wrote ‘Jai Shri Ram’ on Masjid wall turns out to be Muslim, police reveals

याबाबत भैंसाचे पोलिस अधिकारी किरण खरे यांनी सांगितले की, मशिदीच्या भिंतीवर जय श्रीराम लिहिणाऱ्यांचा सुगावा लागला आहे. हा प्रकार कोणी हिंदू व्यक्तीने नव्हे तर मोहम्मद अब्दुल कैफ आणि एका अल्पवयीन मुलाने केला आहे.

तेलंगणमधील भैंसा गाव गेल्या काही दिवसांपासून धार्मिक वादांमुळे आणि मुस्लिम समाजाकडून हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून चर्चेत आले होते.

खरे यांनी सांगितले की, मशिदीच्या भिंतीवर जय श्रीराम’ हा मजकूर लिहिल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार तपास केला. तेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा मजकूर मोहम्मद अब्दुल कैफ आणि एका अल्पवयीन मुलाने लिहिल्याचे उघड झाले आहे. त्यांना अटक केली आहे.

मोहम्मद अब्दुल कैफ हा 20 वर्षांचा असून त्याचा दुसरा साथीदार हा 14 वर्षांचा अल्पवयीन मुलगा आहे. दोघेही मशिदी जवळच राहतात. कैफने सांगितल्याप्रमाणे त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाने मशिदीच्या भीतीवर जय श्रीराम हा मजकूर लिहित असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड झाले आहे. आरोपींनी मजकूर लिहिल्याचे कबूल केल्यामुळे त्यांना अटक केल्याचे पोलिसानी सांगितले.

Bhainsa: Culprit who wrote ‘Jai Shri Ram’ on Masjid wall turns out to be Muslim, police reveals

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात