विशेष प्रतिनिधी
अमृतसर : आर्थिक दिवाळखोरीत सापडलेला पाकिस्तान जागतिक पातळीवरील दबावामुळे थोडासा सुधारलाय असे चित्र दिसत आहे.पाकिस्तानच्या सागरी हद्दीत घुसखोरी केल्याच्या कथित आरोपाखाली अटक केलेल्या भारतीय मच्छीमारांपैकी २० जणांची सुटका करण्यात आली.Bankrupt Pakistan is improving! 20 Indian fishermen released, 577 fishermen detained
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या मच्छीमारांना अट्टारी सीमेवर सोमवारी संध्याकाळी भारताच्या हवाली केले.कराची येथील लाधी जिल्हा तुरुंगात या मच्छीमारांना ठेवण्यात आले होते. त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यावर या भारतीय मच्छीमारांना ईधी फाउंडेशनच्या माध्यमातून लाहोरला आणण्यात आले.
पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झालेल्या मच्छीमारांनी अट्टारीमार्गे भारतात येताच आपल्या मायभूमीला वंदन केले. या सर्व मच्छीमारांची भारतीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तसेच त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली.
सोमवारी रात्री अमृतसरला राहून हे मच्छीमार मंगळवारी गुजरातमधील आपापल्या गावाच्या दिशेने रवाना होतील. त्यापैकी काही जण चार वर्षे पाकिस्तानी तुरुंगात होते. यंदा वर्षीच्या प्रारंभी भारत व पाकिस्तानने माहितीची देवाणघेवाणही केली पाकिस्तानच्या ताब्यात ६२८ भारतीय कैदी असून, त्यात ५१ नागरिक व ५७७ मच्छीमार आहेत. भारताच्या तुरुंगात ३५५ पाकिस्तानी असून, त्यात २८२ नागरिक व ७३ मच्छीमार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App