आसाममधील जनतेने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला बाहेरचा रस्ता (रेड कार्ड) दाखविला असल्याचा आरोप गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. राज्यातील बोडो प्रांतात झालेल्या हिंसाचाराकडे यापूर्वीच्या काँग्रेस सरकारांनी अनेक दशके मूकपणे पाहिले आहे, अशी टीका त्यांनी केली.Assamese people’s red card to Congress front, Prime Minister Narendra Modi’s accusation
विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : आसाममधील जनतेने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला बाहेरचा रस्ता (रेड कार्ड) दाखविला असल्याचा आरोप गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. राज्यातील बोडो प्रांतात झालेल्या हिंसाचाराकडे यापूर्वीच्या काँग्रेस सरकारांनी अनेक दशके मूकपणे पाहिले आहे, अशी टीका त्यांनी केली.
बोडोलॅँडमध्ये एका प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले, फुटबॉल हा आसाममधील लोकप्रिय खेळ आहे, त्यामुळे त्या खेळातील रेड कार्डप्रमाणेच जनतेने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला बाहेरचा रस्ता दाखविला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले असून जनतेने एनडीएला आशीर्वाद दिला आहे. केंद्र व राज्यातील काँग्रेसच्या यापूर्वीच्या सरकारांनी बोडोलॅण्डमधील हिंसाचाराला पायबंध घालण्यासाठी अनेक दशके काहीच केले नाही. मात्र गेल्या पाच वर्षांत आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून बोडोलॅण्डमध्ये शांतता प्रस्थापित केली.
काँग्रेसला लोकांमध्ये बोडो आणि इतर, आसामी-बंगाली, हिंदू-मुस्लीम, वरील आसाम-खालील आसाम, आदिवासी-बिगरआदीवासी अशी फूट पाडू पाहत आहे. नरेंद्र मोदींची घोषणा मात्र सबका साथ सबका विकास अशी आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.
आसाममधील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही काँग्रेसवर फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप केला होता. भाजपा सत्तेत आल्यानंतर राज्याचा सर्वसमावेशक विकास करण्यास प्राधान्य देईल. अल्पसंख्यांसहीत सर्वांना समान सोयी उपलब्ध करुन दिल्या जातील.
आम्ही जेव्हा घरोघरी पाणी पुरवू तेव्हा प्रत्येक घरात पाणी पुरवलं जाईल. यामध्ये मुस्लिमांच्या घरांचाही समावेश असेल. आम्ही जेव्हा सर्वांना घरं देऊ तेव्हा त्यामध्ये अल्पसंख्यांक सामाजातील लोकांचाही समावेश असेल. ल्पसंख्यांक, आदिवासी, बोडो या सर्वांना १० हजार रुपयांची मदत केली जाईल, असे शहा म्हणाले होते.