Fifa World Cup Final : लिओनेल मेस्सीचे स्वप्न साकार!!; ३६ वर्षांनी अर्जेंटिनाने कोरले फुटबॉल वर्ल्ड कप वर नाव; फ्रान्स पराभूत

प्रतिनिधी

कतार : अर्जेंटिनाचा वर्ल्ड क्लास स्टार लिओनेल मेस्सीचे स्वप्न अखेर साकार झाले असून अर्जेंटिनाने फ्रान्सवर विजय मिळवत फिफा वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे. आहे. २०२२ मध्ये फुटबॉल वर्ल्डकप जिंकायचा असा निर्धारच अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी केला होता. तो त्यांनी सिद्ध केला. खेळाडूंच्या जबरदस्त आत्मविश्वास आणि जिद्दीचा प्रत्यय अंतिम सामन्यात आला. अर्जेंटिनाचा संघ मैदानावर उतरल्यावर पहिल्या 45 मिनिटांतच त्यांनी 2 गोल केले. Argentina beat defending champion France by 4-2 on penalties to win FIFA World Cup

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना मेस्सीची अर्जेंटिना आणि एम्बाप्पेच्या फ्रान्स या संघांमध्ये रंगला. फ्रान्सने मोरक्कोचा तर अर्जेंटिनाने क्रोएशियाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. सांघिक खेळ कसा खेळावा याचे दर्शन अर्जेंटिनाच्या खेळामधून फुटबॉलप्रेमींना झाले. अर्जेंटिनाने संपूर्ण सामन्यात सुरूवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. अर्जेंटिनाच्या आक्रमणापुढे फ्रान्सच्या खेळाडूंची दमछाक झाली.

मेस्सीचे स्वप्न साकार

अर्जेंटिनाच्या विजयाने लिओनेल मेस्सीचे स्वप्न साकार झाले आहे. यापूर्वी १९७८ आणि १९८६ मध्ये अर्जेंटनाने फिफा वर्ल्ड कप जिंकला होता. २०१४ मध्ये वर्ल्डकप विजयाचे अर्जेंटिनाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नव्हते. यानंतर आता अर्जेंटिनाने ऐतिहासिक कामगिरी करत फ्रान्सचा पराभव केला आहे. अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर अत्यंत दिमाखात लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉल जगताला गुडबाय केला आहे.

 

Argentina beat defending champion France by 4-2 on penalties to win FIFA World Cup

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात