प्रतिनिधी
म्हैसूर : कर्नाटकातील म्हैसूरमध्ये पुन्हा एकदा PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक समोर आली आहे. येथे पंतप्रधानांचा रोड शो सुरू असताना एका महिलेने आपला मोबाईल त्यांच्या वाहनाकडे फेकला. पोलिसांनी संबंधित महिलेला तत्काळ ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. Another big mistake in PM Modi’s security, woman threw mobile phone with flowers in roadshow in Mysore
चौकशीत महिलेने सांगितले की, ती भाजपची कार्यकर्ता आहे आणि हे चुकून घडले. महिलेने सांगितले की, ती पंतप्रधानांच्या दिशेने फुले फेकत होती, पण तिच्या नकळत मोबाईलही फुलासोबत गेला.
महिलेचा हेतू वाईट नव्हता – पोलीस
अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP), कायदा आणि सुव्यवस्था, आलोक कुमार यांनी सांगितले की हा फोन भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्याचा होता आणि पंतप्रधान मोदी विशेष संरक्षण गट (SPG) संरक्षणाखाली होते.
ते म्हणाले, “ज्या व्यक्तीने पंतप्रधानांच्या वाहनावर फोन फेकला त्याचा कोणताही वाईट हेतू नव्हता. त्यांनी उत्साहाच्या भरात असे केले. पंतप्रधान एसपीजीच्या संरक्षणात होते. फोन भाजपच्या एका कार्यकर्त्याचा आहे. आम्ही त्या व्यक्तीचा शोध घेतला आहे.” आणि फोन एसपीजीकडून त्या व्यक्तीकडे सोपवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App