वृत्तसंस्था
मुंबई : अलीबाबा दास्तान-ए-काबुलमध्ये मुख्य भूमिकेतली टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने सेटवरच गळफास घेऊन शनिवारी आत्महत्या केली. या प्रकरणी तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी तुनिषाचा सहअभिनेता शीजान खान याच्याविरोधात वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर भादवी 306 प्रमाणे वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुनिषा शर्माचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जेजे रूग्णालयात आणण्यात आला असून आज त्याचे शवविच्छेदन केले जाणार आहे. Actor Shijan Khan arrested in actress Tunisha Sharma suicide case
शीजान सोबत तुनिषाचे प्रेमसंबंध
तुनिषा शर्मासोबत काम करणाऱ्या शीजान खानचे तिच्यासोबत प्रेम संबंध होते. त्या नैराश्यातून तिने हे पाऊल उचलले आहे. शीजानला पोलीसांनी चौकशीसाठी शनिवारीच ताब्यात घेतले आहे. त्यानंतर शीजानला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरून शीजानला अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Love Jihad : लव्ह जिहादची हैदराबादी कहाणी; हिंदू मुलाच्या जीवाशी खेळली!!
शीजानने दिलेल्या माहितीनुसार, तुनिषाने बाबा: दास्तान-ए-काबुल सीरियलच्या सेटवर ज्या मेकअप रुममध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली. ती रूम त्याची होती. तो शुटिंग संपवून परत आला. मेकअप रुमचा दरवाजा आतून बंद असल्याने दरवाजा तोडून आत शिरला त्यावेळी तुनिषाने आत्महत्या केली होती. तर असेही सांगितले जात आहे की, शनिवारी दुपारी दोघांनी एकत्र जेवण घेतले. त्यानंतर शीजान शूटिंगसाठी गेला, तेव्हा तिने त्याच्या रूममध्ये गळफास घेतला. याप्रकऱणी शीजानला आज वसई कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पोलीस पुढचा तपास करत आहेत. तुनिषाच्या शवविच्छेदनानंतर तिच्या मृत्यू प्रकरणात काही खुलासे होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App