हैदराबाद : कानपूरमधील ई-बस अपघातानंतर आता तेलंगणातील करीम नगर जिल्ह्यात हृदयद्रावक अपघात झाला आहे. एका अल्पवयीन मुलाने बेपर्वा वेगाने कार चालवत फुटपाथवर बसलेल्या लोकांवर धडक दिली. कारने चिरडल्याने चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. 4 killed in car crash of minor Accident took place on the sidewalk in Hyderabad
या हृदयद्रावक घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की अल्पवयीन मुलाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार फुटपाथवर बसलेल्या लोकांवर चढली. या अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला असून काही जण जखमी झाले आहेत. कारमध्ये तीन अल्पवयीन मुले होती.
करीमनगरचे पोलीस आयुक्त व्ही. सत्यनारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील अल्पवयीन मुलांविरुद्ध आयपीसी कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालकासह सर्व आरोपी अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी कडक कारवाई करत पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह कारमधील तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.
याआधी रविवारी रात्री उशिरा कानपूर, उत्तर प्रदेशमधील टिटमिल क्रॉसरोडजवळ एका अनियंत्रित ई-बसने १७ वाहनांना धडक दिली. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. डझनहून अधिक जखमी झाले आहेत. अपघातानंतर ई-बस पळून जाण्याच्या प्रयत्नात टाटमिल चौकाजवळ एका डंपरला धडकली. ई-बस चालक घटनास्थळावरून पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App