हैदराबादमध्ये अग्निकांडात ११ जण होरपळून ठार; भंगाराच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे भडका

वृत्तसंस्था

हैदराबाद : एका भंगाराच्या दुकानाला लागलेल्या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला. शहरातील भोईगुडा भागातील गोदामात अपघात झाला. त्यावेळी १२ जण उपस्थित होते. एक पळून गेल्याने वाचला आहे. 11 killed in Hyderabad firefight; Scrap shop explodes due to short circuit

हैदराबादचे जिल्हाधिकारी एल. शर्मन यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे ४ वाजता ही घटना घडली. गांधीनगरचे एसएचओ मोहन राव यांनी सांगितले की, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी.



घटनेच्या वेळी हे लोक गोदामात झोपले होते. भीषण आगीमुळे एक भिंत कोसळली. सध्या एक जण बचावला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ११ मृतदेह बाहेर काढले आहेत. आग इतकी भीषण होती की, ती आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागला. या रद्दी गोदामात काम करणारे सर्व मजूर बिहारचे रहिवासी आहेत.

11 killed in Hyderabad firefight; Scrap shop explodes due to short circuit

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात