‘भारतातील युवा पिढीच देशाला नव्या उंचीवर नेईल’

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीत व्यक्त केला विश्वास!


विशेष प्रतिनिधी

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान मोदी बनारस हिंदू विद्यापीठात पोहोचले. यावेळी मोदी म्हणाले की, काशी, जी काळापेक्षा जुनी आहे, ज्याची ओळख तरुण पिढी जबाबदारीने मजबूत करत आहे. हे दृश्य मनाला समाधान देते, अभिमानाची भावना देते आणि अमृतकाळात सर्व तरुण देशाला नव्या उंचीवर घेऊन जातील असा विश्वासही देतात.Young generation of India will take the country to new heights said Prime Minister Narendra Modi



‘नमः पार्वती पतये हर-हर महादेव’ या मंत्राने मोदींनी बीएचयूमध्ये आपल्या भाषणाची सुरुवात केली. काशी ही सर्व ज्ञानाची राजधानी असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आज काशीत विकासाचे ढोल वाजत आहेत, कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प येथे सुरू झाले आहेत. काशीचे काम फक्त महादेवच करू शकतात, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, काशीमध्ये गेल्या 10 वर्षांत जी काही विकासकामे झाली आहेत, त्याबाबत आज दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आहे. या पुस्तकांमध्ये काशीच्या 10 वर्षांच्या विकास प्रवासातील प्रत्येक टप्प्याचे आणि तिथल्या संस्कृतीचे वर्णन केले आहे.

Young generation of India will take the country to new heights said Prime Minister Narendra Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात