• Download App
    "अमृतपाल सिंग कसा निसटला, तुमचे ८० हजार पोलीस काय..." उच्च न्यायालयलाने फटकारलं!You have 80000 cops how could Amritpal Singh escape  HC pulls up Punjab govt

    “अमृतपाल सिंग कसा निसटला? तुमचे ८० हजार पोलीस काय…” उच्च न्यायालयलाने फटकारलं!

    (संग्रहित)

    हे पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाचे अपयश असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    चंदीगड : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने अमृतपाल सिंग प्रकरणी पंजाब पोलिसांना फटकारले आहे. हायकोर्टाने विचारले, “पंजाब पोलिसात ८० हजार जवान आहेत, तरीही अमृतपाल फरार कसा? तुमचे ८० हजार पोलीस काय करत होते? तो कसा पळून गेला?” तसेच हे पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाचे अपयश असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. You have 80000 cops how could Amritpal Singh escape  HC pulls up Punjab govt

    सुनावणीदरम्यान पंजाब पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की अमृतपाल सिंगवर एनएसए देखील लागू करण्यात आला आहे आणि आतापर्यंत अमृतपालच्या १२० पेक्षा अधिक साथीदारांना अटक केली आहे. मात्र पोलिसांच्या कथेवर आमचा विश्वास नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने पंजाब पोलिसांना स्टेटस रिपोर्ट दाखल करण्यास सांगितले आहे.

    ”राहुल गांधी हे सध्या भारतीय राजकारणातील मीर जाफर” लंडनमधील वक्तव्यावरून संबित पात्रांनी साधला निशाणा!

    खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगवर झालेल्या कारवाईबाबत जगातील चार देशांमध्ये त्याचे समर्थक निदर्शने करत आहेत. खलिस्तानी समर्थकांनी सोमवारी (20 मार्च) सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाची तोडफोड केली. या संदर्भात भारताने अमेरिकेच्या एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला दिल्लीत बोलावून त्यांच्यासमोर तीव्र निषेध नोंदवला आहे.

    विशेष म्हणजे अमृतपाल सिंग अद्याप फरार आहे. गेल्या चार दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ज्या कारमधून तो पळून गेला ती गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. अमृतपाल सिंगचे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशीही संबंध असल्याची चर्चा आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपालच्या आणखी दोन साथीदारांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) दाखल करण्यात आला आहे. आता अमृतपाल, कुलवंत सिंग आणि गुर औजला यांच्या दोन साथीदारांवर NSA लादण्यात आली आहे. या दोघांना अटक करून आसाममधील दिब्रुगड येथे पाठवण्यात आले आहे.

    लंडनमध्ये एका व्यक्तीला अटक

    खलिस्तान समर्थकांच्या दंगलीसंदर्भात एका व्यक्तीला स्कॉटलंड यार्डने अटक केली आहे. एक दिवसानंतर यूकेमधील भारतीय उच्चायुक्तालयाभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर खटला चालवावा, अशी विनंती भारताने ब्रिटनला केली आहे.

    You have 80000 cops how could Amritpal Singh escape  HC pulls up Punjab govt

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या मार्क-2 क्षेपणास्त्राचा संरक्षण ताफ्यात समावेश

    कुकी दहशतवद्यांना मणिपूरमध्ये CRPF कॅम्पला केले लक्ष्य ; बॉम्ब फेकले, दोन जवान शहीद

    काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, अरविंदर सिंग लवली यांचा दिल्ली अध्यक्षपदाचा राजीनामा