‘तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसताय..’ ; सुरजेवाला यांच्यावर जगदीप धनखड संतापले?

You are stabbing farmers in the back Jagdeep Dhankhad angry with Surjewala

तुम्ही ऐकायला शिका. कृषिमंत्री उत्तर देत आहेत. त्यांना त्यांचे म्हणणे पूर्ण करू द्या.” असंही म्हणाले

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: अर्थसंकल्प 2024 मध्ये शेतकऱ्यांबाबत केलेल्या तरतुदींवरील चर्चेदरम्यान शुक्रवारी राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ केला. दरम्यान, राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड हे काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला आणि शक्ती सिंह गोहिल यांच्यावर इतके संतापले की त्यांनी त्यांना सभागृह सोडण्याचे निर्देश दिले. You are stabbing farmers in the back Jagdeep Dhankhad angry with Surjewala

धनखड म्हणाले, “शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होऊ न देणारे शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करत आहेत. असे खासदार शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत. आधी तुमची 10 वर्षे बघा.”

शुक्रवारी कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पातील तरतूदीवरील प्रश्नांना उत्तरे देत होते. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव देण्याबाबत चौहान बोलले असता विरोधी खासदारांनी गदारोळ केला. सुरजेवाला यांच्यासह सर्व खासदारांनी एमएसपीच्या हमीभावाचा मुद्दा उपस्थित केला. सुरजेवाला यांनी तर मोदी सरकारला शेतकरी विरोधी सरकार म्हटले आहे.

त्यावर सभापती जगदीप धनखड यांनी विरोधी खासदारांना फटकारले. धनधनखड खर म्हणाले, “मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे. मला शेतकऱ्यांचे हाल माहीत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करा. चर्चेत अडथळा आणून अन्नदात्याचा अपमान करू नका.”

धनखड म्हणाले, “तुम्ही शेतकऱ्यांचा अनादर करत आहात. तुम्ही अन्नदात्याच्या पाठीत वार करत आहात. मला हे अजिबात आवडत नाही. अध्यक्ष काँग्रेस खासदार सुरजेवाला यांना म्हणाले, “तुम्ही ऐकायला शिका. कृषिमंत्री उत्तर देत आहेत. त्यांना त्यांचे म्हणणे पूर्ण करू द्या.”

You are stabbing farmers in the back Jagdeep Dhankhad angry with Surjewala

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात