विशेष प्रतिनिधी
बलरामपूर :Yogi Adityanath उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा कडक शब्दांत इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “गजवा-ए-हिंद”च्या नावाखाली देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थेट जहन्नुमची (नरकाची) तिकिटे मिळतील.Yogi Adityanath
बलरामपूर येथील सार्वजनिक सभेत ते म्हणाले, “काही लोक भारतात राहत असूनही ‘गजवा-ए-हिंद’सारख्या घोषणांनी देशविरोधी कारवाया करतात. पण हे कधीही भारतीय भूमीवर सहन केले जाणार नाही. हा देश संतांच्या आदर्शांवर चालला आहे आणि भविष्यातही त्याच मार्गाने चालत राहील.”Yogi Adityanath
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “गजवा-ए-हिंदचे स्वप्न पाहणे म्हणजे थेट नरकाकडे जाण्याचे तिकीट काढणे आहे. जर कोणी स्वतःला नरकात ढकलू इच्छित असेल, तर त्यांनी या नावाखाली देशात गोंधळ घालून बघावा. पण राज्य सरकार त्यांना मुळीच सोडणार नाही.”
योगी आदित्यनाथ यांनी इशारा दिला की, “या विचारधारेला पोसणाऱ्यांनी कान उघडे करून ऐकून घ्या. लवकरच त्यांचाही बंदोबस्त चांगूर बाबा उर्फ जलालुद्दीनप्रमाणे केला जाईल.”
ते पुढे म्हणाले, “सण-उत्सवांच्या काळात जर कोणी उपद्रव माजवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना अशी शिक्षा दिली जाईल की त्यांच्या पुढच्या पिढ्याही विसरणार नाहीत. जे लोक अशा मानसिकतेने जगतात त्यांनी आपली गैरसमज दूर करून टाकावी. आता तो काळ गेला आहे, जेव्हा अशा लोकांना राज्य सरकार सहन करत असे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल.”
या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी देशविरोधी कारवाया आणि धार्मिक कट्टरतावाद्यांना थेट इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकार कुठलीही तडजोड करणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App