वृत्तसंस्था
कोलकाता : सचिनसारखा कोणी नाही रे… सचिन फक्त एकच, (Sachin Tendulkar) असं म्हटलं गेलं. मात्र, काळवेळ पुढे गेला अन् सचिनची भविष्यवाणी खरी ठरली. विराट कोहली माझा विक्रम मोडेल, असं भाकित सचिन तेंडूलकरने केलं होतं. ते आज तंतोतंत खरं ठरलं त्यांना देखील दैवाधीन मुहूर्त लाभला तो किंग कोहलीच्या वाढदिवसाचा!! आपल्या वाढदिवशीच विराट कोहलीने सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली. world cup 2023 india vs south africa kohli made century his birthday
वनडे क्रिकेटमध्ये (ODI Cricket) सचिन तेंडूलकरच्या नावावर सर्वाधिक 49 शतकांचा विक्रम होता. आता विराट कोहलीने 49 शतकं पूर्ण केली आहेत. योगायोग म्हणजे विराटने त्याच्या बर्थडे दिवशी आपल्या करियरमधील 49 वं शतक पूर्ण केलं. त्यामुळे द गॉड अँड द किंग अशी क्रिकेट मधली एपिक स्टोरी लिहिली गेली आहे.
ICC विश्व कप 2023: विराट कोहली ने अपने 35वें जन्मदिन पर कोलकाता के ईडन गार्डन्स में दक्षिण अफ्रीका के खिलाफ अपना 49वां वनडे शतक पूरा किया और सर्वाधिक वनडे शतकों के मामले में सचिन तेंदुलकर की बराबरी की। (तस्वीर: BCCI) pic.twitter.com/3jV88qDaWq — ANI_HindiNews (@AHindinews) November 5, 2023
ICC विश्व कप 2023: विराट कोहली ने अपने 35वें जन्मदिन पर कोलकाता के ईडन गार्डन्स में दक्षिण अफ्रीका के खिलाफ अपना 49वां वनडे शतक पूरा किया और सर्वाधिक वनडे शतकों के मामले में सचिन तेंदुलकर की बराबरी की।
(तस्वीर: BCCI) pic.twitter.com/3jV88qDaWq
— ANI_HindiNews (@AHindinews) November 5, 2023
विराटचं वनडे करियर
विराट कोहलीने (virat Kolhi) आत्तापर्यंत 289 वनडे सामने खेळले असून त्यात त्याने 58.43 च्या सरासरीने आणि 93.55 च्या स्टाईक रेटने धावा खेचल्या आहेत. 1275 फोर आणि 149 सिक्स असा भन्नाट रेकॉर्ड विराटच्या नावावर राहिला आहे.
कोलकता ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रीकेचा विरुद्ध भारताने नाणेफेक जिंकला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. नियोजनाप्रमाणे रोहित आणि प्रिन्स शुभमन गिलने दमदार सुरूवात करून दिली. मात्र, सहाव्या ओव्हरमध्ये रोहित बाद झाला. तर 11 व्या ओव्हरमध्ये शुभमन गिल देखील फिरकीच्या जाळ्यात अडकला. तर मैदानात आलेल्या श्रेयस अय्यर आणि विराटने साऊथ अफ्रिकेच्या गोलंदाजांवर आक्रमण सुरू केलं. अय्यरने 77 धावांची विराट खेळी केली. मात्र, विराटने मैदानात पाय रोवले अन् वनडे क्रिकेटमधील अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली. विराटची स्वप्नपूर्ती झाली.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग11 :
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.
टीम इंडियाची प्लेइंग 11 :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
ICC विश्व कप: कोलकाता के ईडन गार्डन्स में खेले जा रहे भारत बनाम साउथ अफ्रीका मैच में भारत ने पहले बल्लेबाजी करते हुए 50 ओवर में 5 विकट के नुकसान पर 326 रन बनाए। (फोटो सौजन्य: BCCI) pic.twitter.com/5IX5LtgZ5X — ANI_HindiNews (@AHindinews) November 5, 2023
ICC विश्व कप: कोलकाता के ईडन गार्डन्स में खेले जा रहे भारत बनाम साउथ अफ्रीका मैच में भारत ने पहले बल्लेबाजी करते हुए 50 ओवर में 5 विकट के नुकसान पर 326 रन बनाए।
(फोटो सौजन्य: BCCI) pic.twitter.com/5IX5LtgZ5X
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App