छत्तीसगडमधील महिलांना आता दरमहा 1000 रुपये मिळणार

या योजनेसाठी आजपासून अर्ज स्वीकारले जात आहेत.

विशेष प्रतिनिधी

रांची : छत्तीसगड सरकारने महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. महतरी वंदन योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून दरमहा एक हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेसाठी आजपासून अर्ज स्वीकारले जाणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी आहे. यानंतर मार्चमध्ये पहिला हप्ता दिला जाईल. Women in Chhattisgarh will now get Rs 1000 per month

DBT द्वारे पात्र महिलांना दरमहा 1000 रुपये दिले जातील. सामाजिक सहाय्य कार्यक्रम आणि विविध पेन्शन योजनांमधून निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या महिलांना पेन्शनची रक्कम 1000 पेक्षा कमी असल्यास उर्वरित रक्कम दिली जाईल. म्हणजेच एकाही महिलेला एका महिन्यात 1000 रुपयांपेक्षा जास्त मदत दिली जाणार नाही.

या पात्रता अटी आहेत –

छत्तीसगड राज्यातील स्थानिक रहिवाशांनाच याचा लाभ मिळेल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी विवाहित असणे आवश्यक आहे

विवाहित महिलेचे वय 1 जानेवारी 2024 रोजी 21 वर्षांपेक्षा कमी नसावे

विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिला देखील योजनेसाठी पात्र असतील.

Women in Chhattisgarh will now get Rs 1000 per month

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात