नाशिक : पश्चिम बंगाल मध्ये झालेली चूक काँग्रेस सुधारणार का??; उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी आघाडी करणार का??, असे दोन सवाल काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्यामुळे आज समोर आले.
सलमान खुर्शीद यांचे वक्तव्य
सलमान खुर्शीद यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांनी आघाडी केली, तर दोन्ही पक्षांना चांगले यश मिळेल दोन्ही पक्षांची आघाडी “पॉलिटिकल गेम चेंजर” ठरेल, असा दावा केला. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका कोण जिंकेल??, याविषयी आत्ताच भाकीत करणे कठीण आहे. कारण परिस्थिती अस्थिर आहे. भाजपवाले कितीही दावा करत असले, तरी उत्तर प्रदेशात त्यांना अनुकूल स्थिती नाही. काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोघांनी सामंजस्याने आघाडी केली तर दोघांनाही त्याचा चांगला लाभ होईल, असे सलमान खुर्शीद म्हणाले.
ममता बॅनर्जींचा राजकीय अहंकार
सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसची समाजवादी पार्टी बरोबर आघाडी करण्याची राजकीय गरज आणि उताविळी दिसली. वास्तविक पश्चिम बंगालमध्ये सुद्धा काँग्रेसला ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची आघाडी करायची होती. तृणमूळ काँग्रेस देईल तेवढ्यात जागा पदरात पाडून घ्यायची काँग्रेसची तयारी होती. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तसे पॉलिटिकल सिग्नल सुद्धा ममता बॅनर्जींना दिले होते. पण ममता बॅनर्जी यांचा राजकीय अहंकार एवढा शिखरावर पोहोचला होता, की त्यांनी स्वबळाच्या अहंकारापोटी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची सुद्धा सूचना धुडकावली. त्यांनी काँग्रेसला सन्मान जनक जागा देणे तर सोडाच, काँग्रेसच्या नेत्यांशी सौजन्याने बातचीत सुद्धा केली नाही. त्याचा परिणाम पश्चिम बंगालमध्ये दिसला. काँग्रेसचा तिथे सुपडा साफ झाला पण ममता बॅनर्जी एवढ्या दारूण हरल्या की त्यांनी स्वतःचा तृणमूळ काँग्रेस पक्ष सुद्धा आपल्या हातातून गमावला.
आकडे बोलले
पश्चिम बंगाल मधल्या निवडणुकीच्या आकडेवारीतूनच काँग्रेस आणि तृणमूळ काँग्रेस यांनी न केलेल्या आघाडीचे अपयश दिसून आले. तृणमूल काँग्रेसला तिथे 40.80% मते मिळाली तर काँग्रेसला 2.97% मते मिळाली. तोरणामुळे काँग्रेसची तिथली एकूण मतसंख्या 26013377 एवढी होती, तर काँग्रेसची मतसंख्या 1890858 एवढी होती. यांची बेरीज 27904235 एवढी झाली. भाजपला तिथे 45.84% मते मिळाली. भाजपची मतसंख्या 29224804 एवढी राहिली. याचा अर्थ काँग्रेस आणि तृणमूळ काँग्रेस एकत्र लढले असते तर भाजपचा पराभव झाला असता असे नाही पण आज जेवढा त्यांना प्रचंड विजय मिळाला तेवढा प्रचंड विजय तिथे मिळू शकला नसता. उलट तृणमूळ काँग्रेसच्या जागा या 215 वरून येऊन 80 वर आदळल्या. तेवढ्या जागा बिलकुल कमी झाल्या नसत्या. तृणमूल काँग्रेसला 125 ते 135 पर्यंत जागा मिळाल्या असत्या, तर भाजपला तिथे तगडे आव्हान जसेच्या तसे राहिले असते. याचा अर्थच ममता बॅनर्जी यांच्या राजकीय अहंकारापोटी त्यांनी पश्चिम बंगालची सत्ता गमावली. तिथे त्यांनी काँग्रेसची धुळधाण केली, त्याचबरोबर स्वतःच्या पक्षाची सुद्धा वाताहत केली.
चूक सुधारणार का??
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल मध्ये चूक केली त्यांनी काँग्रेसला दूर लोटले. उत्तर प्रदेशात तशीच चूक समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव करतील की ममतांची चूक ते उत्तर प्रदेशात सुधारून काँग्रेस बरोबर आघाडी करतील??, हा खरा सवाल आहे. कारण उत्तर प्रदेशात आजही समाजवादी पार्टीचे विशिष्ट ताकद आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे 101 आमदार आहेत. 37 खासदार आहेत. काँग्रेसचे तिथे सहा खासदार असून आमदारांची संख्या फक्त दोन आहे. पण याचा अर्थ असा नाही की काँग्रेसला तिथे धुडकावून चालेल. कारण काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांनी आघाडी केली आणि बेरजेचे राजकारण केले, तर दोन्ही पक्षांना तिथे मोठा लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे. किंबहुना तिथे भाजपला मोठा तडाखा बसण्याची सुद्धा शक्यता आहे. कारण उत्तर प्रदेशात योगी राज असले, तरी तिथले सामाजिक ताणेबाणे वेगळे झालेत. तिथले ब्राह्मण आमदार आणि ठाकूर आमदार भाजपवर नाराज आहेत. नुकत्याच झालेल्या राम मंदिरातील देणगीच्या चोरी बद्दल हिंदू समाज सुद्धा नाराज आहे. योगी राज मध्ये कायदा आणि सुव्यवस्था उत्तम असली आणि बुलडोझर जोरात चालू असले तरी सामाजिक अस्वस्थतेची चिंता भाजपला भेडसावते आहे. अशा स्थितीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांनी बेरजेचे राजकारण केले तर त्यांना अगदी विजयापर्यंत पोहोचता नाही आले तरी भाजपला दणका देण्याची त्यांची क्षमता निर्माण होऊ शकेल आणि त्याही पलीकडे जाऊन विरोधक निवडणुकीच्या मैदानात एक होऊ शकतात, हा राजकीय संदेश सुद्धा ते देशभर पोहोचवू शकतील.
Will the Congress rectify the mistake made in West Bengal?
महत्वाच्या बातम्या
- ठाकरेंच्या ६ खासदारांचा शिंदे सेनेत प्रवेश; सर्वांना धनुष्यबाणावर निवडून आणायचे शिंदेंचे आश्वासन!!
- नाशिक मध्ये फुटली तब्बल 218 मते; नरेंद्र दराडे यांच्या पराभवात भाजप बरोबर राष्ट्रवादीचाही हात!!
- Trump : ट्रम्प म्हणाले– इराणने हिजबुल्लाहला थांबवावे, अन्यथा पुन्हा हल्ला करू:अमेरिका-इराण यांच्यात 82 मिनिटे चर्चा
- Mumbai BEST Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; शिंदेंची मोठी घोषणा, वेतनवाढीसह ग्रॅच्युईटीचा मार्ग मोकळा