facebook – Whatsapp Down : जगभरात व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ठप्प, युजर्सकडून ट्विटरवर तक्रारींचा पाऊस

Whatsapp facebook insta down worldwide users unable to send or receive messages

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामने जगभरात अचानक काम करणे बंद केले आहे. सोमवारी रात्री 9.15 च्या सुमारास ही समस्या समोर आली. भारतासह जगभरातील तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे कोट्यवधी वापरकर्ते आहेत. यानंतर लोकांनी लगेच ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया देणे सुरू केले. मात्र, हे सोशल प्लॅटफॉर्म अचानक डाऊन होण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. Whatsapp facebook insta down worldwide users unable to send or receive messages


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामने जगभरात अचानक काम करणे बंद केले आहे. सोमवारी रात्री 9.15 च्या सुमारास ही समस्या समोर आली. भारतासह जगभरातील तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे कोट्यवधी वापरकर्ते आहेत. यानंतर लोकांनी लगेच ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया देणे सुरू केले. मात्र, हे सोशल प्लॅटफॉर्म अचानक डाऊन होण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

ही आउटेज समस्या अजूनही कायम आहे. लोक कुणालाही संदेश पाठवू किंवा प्राप्त करू शकत नाहीत. कंपनीचा सर्व्हर डाऊन असल्याने ही समस्या येत आहे. आउटेज ट्रॅकिंग कंपनी Downdetector.com च्या मते, 20 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर याबद्दल तक्रार केली आहे.

काय म्हटले व्हॉट्सअपने ?

वृत्तसंस्था एएनआयनुसार व्हॉट्सअपने याबाबत खुलासा आहे. त्यांनी म्हटले की, आम्हाला माहिती आहे की काही लोकांना सध्या व्हॉट्सअॅपमध्ये समस्या येत आहेत. आम्ही गोष्टी पुन्हा सामान्य करण्यासाठी काम करत आहोत आणि शक्य तितक्या लवकर येथे अपडेट पाठवू,.”

अँड्रॉइड, आयओएस आणि पीसी सर्वत्र डाऊन

सर्व तीन प्लॅटफॉर्म डाऊन करण्याची समस्या सर्व Android, iOS आणि PC वर दिसून आली. फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरकर्ते न्यूज फीड अपडेट करू शकले नाहीत, तर व्हॉट्सअॅप वापरकर्ते कोणताही संदेश पाठवू शकले नाहीत. तथापि, या तिघांच्या सेवा कशामुळे ठप्प झाल्या, हे माहिती नाही.

6 महिन्यांपूर्वीही 42 मिनिटांसाठी ठप्प

6 महिन्यांपूर्वीसुद्धा व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक जगभर 42 मिनिटांसाठी ठप्प झाले होते. तेव्हा ही समस्या रात्री 11.05 वाजता सुरू झाली आणि सुमारे 11:47 पर्यंत चालू राहिली. जगात व्हॉट्सअॅप 5 अब्जाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. सर्व्हरवरील लोड वाढल्यामुळे व्हॉट्सअॅप यापूर्वी अनेक वेळा क्रॅश झाले आहे. कोट्यवधी युजर्स त्रस्त होण्यासाठी एवढाही वेळ पुरेसा आहे. तथापि, जगभरात व्हॉट्सअॅप क्रॅश झाल्याच्या काही बातम्या आहेत.

Whatsapp facebook insta down worldwide users unable to send or receive messages

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*