चोरी, दरोडेखोरी, बलात्कारात मुस्लिमच नंबर 1; AIUDF खासदार बद्रुद्दिन अजमल हे काय बोलून गेले??

वृत्तसंस्था

दीसपूर : चोरी, दरोडेखोरी, बलात्कार करण्यात आणि जेलमध्ये जाण्यात मुस्लिमच नंबर 1 आहेत. कारण त्यांच्यात उच्च शिक्षणाचा अभाव आहे, असे धक्कादायक वक्तव्य ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट या आसाम मधल्या पक्षाचे अध्यक्ष खासदार बद्रुद्दिन अजमल यांनी केले. त्यामुळे मुस्लिम समाजासह संपूर्ण देशात एक वेगळीच खळबळ निर्माण झाली. बद्रुद्दिन अजमल यांच्यासारखा आसाम मधला एक महत्त्वाचा नेता हे काय वक्तव्य करून बसला??, असा सवाल तयार झाला आणि अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. पण स्वतः अजमल मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. What did AIUDF MP Badruddin Ajmal say

आसाम मधल्या एका कार्यक्रमात खासदार बद्रुद्दिन अजमल यांनी मुस्लिम समाजाला खडे बोल सुनावत त्यांच्यातले दोष दाखवून दिले. मुस्लिमांमध्ये इतर समाजांपेक्षा क्राईम रेटचे प्रमाण जास्त आहे, ही वस्तुस्थिती आपण बोलल्याचे त्यांनी सांगितले. पण त्याचे कारणही मुस्लिमांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्याचे ते म्हणाले. मी जगभर फिरलो तेव्हा माझ्या लक्षात आले की, संपूर्ण जगातच मुस्लिमांमध्ये उच्च शिक्षणाचा अभाव आहे. अनेक मुस्लिम मुले दहावीपर्यंत देखील शिकत नाहीत. पुढच्या शिक्षणाचा तर प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे मुस्लिमांमध्ये क्राईम रेटचे प्रमाण वाढते आहे.

शिक्षणाच्या मुद्द्यावर आपण वेगवेगळ्या सरकारांवर नेहमीच आरोप करतो, पण सरकार जेव्हा मुस्लिम समाजातले डॉक्टर्स, इंजिनियर्स किंवा उच्चपदस्थ यांच्यासाठी संधी उपलब्ध करून देते, त्यावेळी मात्र मुस्लिम समाजात त्या प्रमाणात डॉक्टर्स, इंजिनियर्स किंवा अन्य व्यवसायातले उच्चपदस्थ नसतात ही वस्तुस्थिती आहे, याकडे बद्रुद्दिन अजमल यांनी लक्ष वेधले.

मुस्लिम मुले मुलींकडे आकर्षित होतात. कोणताही पुढचा मागचा विचार न करता अत्याचाराला प्रवृत्त होता, पण इस्लाम मध्ये असे करणे बिलकुलच मान्य नाही. घरातल्या स्त्रियांकडे पुरुष जसे बघतो, तसेच अन्य स्त्रियांकडे पाहिले पाहिजे, असे इस्लाम मानतो, असेही बद्रुद्दिन अजमल म्हणाले.



बद्रुद्दिन अजमल यांच्या वक्तव्यातला सुरुवातीचा भाग जरी आक्षेपार्ह वाटला तरी त्यांनी मुस्लिम समाजातील दोष दाखवून दिल्याचेच दिसून येते.

कोण आहेत अजमल?

बद्रुद्दिन अजमल हे आसाम मधले एक प्रभावी नेते आहेत. 2009 पासून ते आसाम मधल्या धुबरी मतदार संघातून लोकसभेत निवडून येत आहेत. त्यांचा अत्तराचा व्यवसाय आहे आणि आसाम मधल्या बंगाली भाषेत मुसलमानांवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट या पक्षाचे आसाम विधानसभेत 15 आमदार आहेत.

बद्रुद्दिन अजमल यांनी आत्तापर्यंत अनेक वादग्रस्त वक्तव्य केली. पण मुस्लिमांमधील क्राईम रेट विषयी त्यांनी केलेले वक्तव्य खुद्द मुस्लिम समाजात वादग्रस्त ठरले आणि त्यांचा सर्वत्र निषेध झाला. पण त्यांनी मुस्लिमांचे दोष दाखवताना आपण त्या विधानावर ठाम असल्याचे सांगितले.

What did AIUDF MP Badruddin Ajmal say

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात