सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून युजर्सचे डोळे पाणावतात. विमान अपघात आणि विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. आता असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक मालवाहू विमान विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करताना दिसत आहे.WATCH Two parts of plane crashed during emergency landing, heartbreaking video
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून युजर्सचे डोळे पाणावतात. विमान अपघात आणि विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. आता असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक मालवाहू विमान विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करताना दिसत आहे.
विमानाचे लँडिंग इतके भयंकर आहे की ते पाहून प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये डीएचएल कंपनीचे विमान विमानतळाच्या धावपट्टीवर घसरताना आणि आपत्कालीन लँडिंगच्या वेळी त्याचे दोन तुकडे झाल्याचे दिसत आहे.
Footage of a DHL cargo plane having an accident after landing on the runway of an airport in Costa Rica. Splits in two! pic.twitter.com/gjtkmrqJqq — AlAudhli العوذلي ™ (@alaudhli) April 8, 2022
Footage of a DHL cargo plane having an accident after landing on the runway of an airport in Costa Rica. Splits in two! pic.twitter.com/gjtkmrqJqq
— AlAudhli العوذلي ™ (@alaudhli) April 8, 2022
हा व्हिडिओ जुआन सांतामारिया आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आहे, जिथे डीएचएलचे बोईंग 757-200 मालवाहू विमान आपत्कालीन लँडिंग दरम्यान क्रॅश झाले. DHL चे हे बोईंग ग्वाटेमालाला जात होते, पण हायड्रोलिक्स सिस्टीममध्ये काही बिघाड झाल्यामुळे त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
अशा प्रकारे विमानाचे दोन भाग होणे सामान्य नाही. या विमान अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे डीएचएल कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे, ही दिलासादायक बाब आहे. त्याचबरोबर DHL कंपनीने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App